IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : माही है तो मुनकीन है! महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) यष्टिंमागील चपळतेला तोड नाही.. कर्णधार म्हणून तो केवळ सामना योग्य रितीने वाचत नाही, तर प्रतिस्पर्धी फलंदाजाचाही यष्टिंमागून चांगला अभ्यास करत असतो. त्यांच्या एका चूकीची तो वाट पाहत असतो अन् मोकैपे चौका मारतो... ३ धावांवर शुबमन गिलचा झेल टाकल्यानंतर गुजरात टायटन्सच्या सलामीवीराने हात मोकळे करण्यास सुरूवात केली होती. पण, चतूर माहिने रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja) गोलंदाजीला आणले अन् धोनीने ट्वेंटी-२०त त्याचा ३००वा बळी टिपला. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला.
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शुबमन गिलचा झेल सोडल्याने कायं होतं, याचं उत्तर मुंबई इंडियन्स चांगलं देऊ शकतात. पण, आज चेन्नई सुपर किंग्सलाही याचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. गिलने GTला वृद्धीमान साहासह सावध सुरूवात करून दिली. तुषार देशपांडेच्या दुसऱ्या षटकात शुबमनचा स्क्वेअर लेगला दीपक चहरने सोपा झेल टाकला. गिलला ३ धावांवर जीवदान दिले. क्वालिफायर १ सामन्यातही तुषारच्या गोलंदाजीवर गिलला जीवदान मिळाले होते आणि आजही तेच झाले. तुषारच्या पुढच्या षटकात गिलने सलग ३ चौकारांनी सुरुवात केली. त्याआधी साहाने तिसऱ्या षटकात ६,४,४,२ अशा १६ धावा चोपल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात महिषा तीक्षणाच्या गोलंदाजीवर गिलने सुरेख ३ चौकार खेचले अन् संघाला बिनबाद ६२ धावांपर्यंत पोहोचवले. ( IPL 2023 Final GT vs CSK Live Scoreboard Marathi )
आज सर्व काही गुजरातच्या बाजूने होताना दिसले अन् गिल दोन वेळा धावबाद होता होता वाचला. ७व्या षटकाचा अखेरचा चेंडू रवींद्र जडेजाने वेगाने फेकला अन् गिलच्या बॅटीच्या जवळून गेला. महेंद्रसिंग धोनीने तितक्याच चपळतेनं बेल्स उडवल्या अन् अम्पायरकडे पाहत तो जडेजाला हात मिळवण्यासाठी पुढे गेला. मोठ्या स्क्रीनवर जेव्हा धोनीची ही चपळता पाहायला मिळाला तेव्हा एकच जल्लोष झाला, कारण गिलला ३९ धावांवर यष्टिचीत होऊन माघारी परतावे लागले. गुजरातच्या ९ षटकांत १ बाद ८० धावा झाल्या.