IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने थैमान घातलेले पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना होणार आहे, परंतु पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढत चालला आहे आणि वीजाही कडाडत आहेत. स्टेडियमपासून २० किमी अंतरावर असलेल्या बोपल या ठिकाणी गारांचा पाऊस पडत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज सामना न झाल्यात उद्या म्हणजेच सोमवारी ही मॅच खेळवण्यात येईल. उद्याची अशीच परिस्थिती राहिली तर दोन्ही संघांना विजयी घोषित केले जाईल. पण, आताच आयपीएलने अपडेट्स दिले असून पावसामुळे नाणेफेक उशीराने होणार आहे.
महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) आयपीएलमधील शेवटची मॅच पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने आले आहेत, परंतु पावसामुळे आता स्टेडियम रिकामी झालेलं पाहायला मिळतंय. धोनीचा हा २५०वा आयपीएल सामना असणार आहे आणि हा पल्ला गाठणारा तो पहिला खेळाडू आहे. नाणेफेकीला अर्धा तास शिल्लक असताना पावसाची सुरूवात झाली आहे आणि खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. प्रत्येक प्ले ऑफसाठी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ राखीव ठेवला गेला आहे. त्यामुळे ९.४० वाजेपर्यंत मॅच सुरू होऊ शकते. १०.१० वाजता मॅच सुरू झाल्यास षटकं कमी केले जाणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआयही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
क्रिक बजने दिलेल्या माहितीनुसार १२.२६ पर्यंत ५-५ षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. तेही न झाल्यास सुपर ओव्हर होईल आणि तेही शक्य नसल्यास गुजरात टायटन्सला विजयी घोषित केले जाईल. पण, आकाश चोप्राने ट्विट करून मोठे अपडेट्स दिले आहेत. त्याच्या नुसार उद्या राखीव दिवस ठेवला गेला आहे.
Web Title: IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : toss has been delayed by rain, Reports from the ground suggest the rain has got harder, there is now some thunder around as well
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.