IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने थैमान घातलेले पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना होणार आहे, परंतु पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढत चालला आहे आणि वीजाही कडाडत आहेत. स्टेडियमपासून २० किमी अंतरावर असलेल्या बोपल या ठिकाणी गारांचा पाऊस पडत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज सामना न झाल्यात उद्या म्हणजेच सोमवारी ही मॅच खेळवण्यात येईल. उद्याची अशीच परिस्थिती राहिली तर दोन्ही संघांना विजयी घोषित केले जाईल. पण, आताच आयपीएलने अपडेट्स दिले असून पावसामुळे नाणेफेक उशीराने होणार आहे.
क्रिक बजने दिलेल्या माहितीनुसार १२.२६ पर्यंत ५-५ षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. तेही न झाल्यास सुपर ओव्हर होईल आणि तेही शक्य नसल्यास गुजरात टायटन्सला विजयी घोषित केले जाईल. पण, आकाश चोप्राने ट्विट करून मोठे अपडेट्स दिले आहेत. त्याच्या नुसार उद्या राखीव दिवस ठेवला गेला आहे.