IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा लपंडाव! दर दुसऱ्या मिनिटाला एन्ट्री; ९.३५ पर्यंत असंच राहिलं तर...

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 09:09 PM2023-05-28T21:09:18+5:302023-05-28T21:10:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : UPDATE from Ahmedabad, Overs will start reducing after 9:35 PM IST.The rain has stopped at Narendra Modi Stadium  | IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा लपंडाव! दर दुसऱ्या मिनिटाला एन्ट्री; ९.३५ पर्यंत असंच राहिलं तर...

IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा लपंडाव! दर दुसऱ्या मिनिटाला एन्ट्री; ९.३५ पर्यंत असंच राहिलं तर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळतोय.. दर दुसऱ्या मिनिटाला विश्रांती घेत पाऊस पडतोय... सायंकाळी ६ वाजल्यापासून अहमदाबाद येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अखेर ९ वाजता विश्रांती घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना येथे  खेळवला जाणार आहे. पण, चाहत्यांना खूपच वाट पाहावी लागली आहे. आता पाऊस थांबला असून कव्हर्स हटवण्यासचं व मैदान सुकवण्याचं काम सुरू आहे. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आले असून अम्पायर्सही खेळपट्टीची पाहणी करत आहेत.

 
प्रत्येक प्ले ऑफसाठी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ राखीव ठेवला गेला आहे. त्यामुळे ९.४० वाजेपर्यंत मॅच सुरू होऊ शकते. १०.१० वाजता मॅच सुरू झाल्यास षटकं कमी केले जाणार नाहीत. १२.२६ पर्यंत ५-५ षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. तेही न झाल्यास सुपर ओव्हर होईल आणि तेही शक्य नसल्यास राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण, आता पाऊस थांबल्याने सामना होण्याची शक्यता सुरू झाली आहे. मात्र, आयपीएलने ट्विट केले आहे की, ९.३५ नंतर षटकांवर कात्री लागण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील अर्ध्या तासात सामना सुरू न झाल्यास षटकांची संख्या कमी होऊ शकते.

9.45pm - 19 overs per side.
10.30pm - 15 overs per side.
11pm - 12 overs per side.
11.30pm - 9 overs per side.

Web Title: IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : UPDATE from Ahmedabad, Overs will start reducing after 9:35 PM IST.The rain has stopped at Narendra Modi Stadium 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.