Join us  

सचिन तेंडुलकरकडून शुबमन गिलचं भरभरून कौतूक; म्हणाला, त्याने आशा जागवल्याही अन्... 

IPL 2023 Final : शुबमन गिल ( Shubman Gill) च्या कामगिरीसमोर सध्या जग ठेंगणे वाटू लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा हंगाम गुजरात टायटन्सच्या या सलामीवीराने गाजवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 4:31 PM

Open in App

IPL 2023 Final : शुबमन गिल ( Shubman Gill) च्या कामगिरीसमोर सध्या जग ठेंगणे वाटू लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा हंगाम गुजरात टायटन्सच्या या सलामीवीराने गाजवला आहे. त्याने १६ सामन्यांत ३ शतकांसह ८५१ धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आणि जॉस बटलर यांच्यानंतर एका हंगामात तीन शतकं झळकावणारा आणि ८००+ धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. आयपीएलच नव्हे तर शुबमनने मागील ६ महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवून सोडले आहे. शुबमनचे कौतुक सारे जग करत आहे आणि आज महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही ( Sachin Tendulkar) त्याचे भरभरून कौतुक केले आहे. 

Special Blog : महेंद्रसिंग धोनी आज पाचवं IPL टायटल जिंकून निवृत्ती घेणार की पुन्हा चकवा देणार?

शुबमनच्या शतकी खेळीमुळेच मुंबई इंडियन्स प्ले ऑफसाठी पात्र ठरले अन् त्याच्याच शतकाने रोहित शर्माच्या संघाला क्वालिफायर २ मधून बाहेर फेकले. ''शुबमन गिलची यंदाच्या पर्वातील कामगिरी अविश्वसनीय आहे. त्याच्या दोन शतकांनी अमिट प्रभाव टाकला आहे. एका शतकाने मुंबई इंडियन्सला आशेचा किरण दाखवला, तर दुसऱ्या शतकाने स्वप्नांचा चुराडा केला. क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल आहे,''असे सचिनने ट्विट केले.

''शुबमनच्या फलंदाजीबद्दल मला खरोखर प्रभावित केले ते म्हणजे त्याचा विलक्षण स्वभाव, अविचल शांतता, धावांची भूक आणि विकेट्सच्या दरम्यान चपळ धावणे. मोठ्या धावांचा पाठलाग करताना नेहमी निर्णायक क्षण असतात जे निकालाला आकार देतात आणि १२व्या षटकापासून शुबमनच्या अपवादात्मक खेळीने गुजरात टायटन्सला एक सस्मरणीय धावसंख्या गाठून दिली. वेग पकडण्याची आणि खेळावर खोलवर परिणाम करण्याच्या त्याच्या क्षमतेचे हे प्रदर्शन होते. त्याचप्रमाणे मोहम्मद शमी विरुद्ध लिलक वर्माच्या धडाकेबाज धावांनी मुंबईने खेळात पुनरागमन केले आणि सूर्यकुमार बाद होईपर्यंत सामन्यातील चुरस कायम होती,'' असेही सचिनने पुढे लिहिले.

त्याने पुढे लिहिले की,''गुजरात एक मजबूत संघ आहे. शुबमन गिल, हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर हे आजच्या सामन्यात महत्त्वाचे फलंदाज ठरणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजीची खोली खोल आहे. महेंद्रसिंग धोनी ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो आणि त्यामुळे आजच्या सामन्यात धावांचा पाठलाग होताना दिसेल. आजची लढत इंटरेस्टिंग असेल.''

टॅग्स :आयपीएल २०२३शुभमन गिलसचिन तेंडुलकर
Open in App