MI, CSK नाहीतर 'कट्टर प्रतिस्पर्धी' खेळणार IPL 2023 ची फायनल; श्रीसंतची भविष्यवाणी

ipl 2023 final match : आयपीएलचा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 07:20 PM2023-05-17T19:20:45+5:302023-05-17T19:22:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 final will be between Lucknow Super Giants and Royal Challengers Bangalore, says former India player S Sreesanth | MI, CSK नाहीतर 'कट्टर प्रतिस्पर्धी' खेळणार IPL 2023 ची फायनल; श्रीसंतची भविष्यवाणी

MI, CSK नाहीतर 'कट्टर प्रतिस्पर्धी' खेळणार IPL 2023 ची फायनल; श्रीसंतची भविष्यवाणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

LSG vs RCB |मुंबई : आयपीएलचा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स सध्या एकमेव संघ आहे, तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ टॉप-४ च्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. प्लेऑफमधील उर्वरित ३ जागांसाठी सात संघांमध्ये स्पर्धा आहे. अशातच भारतीय संघाचा माजी गोलंदाज श्रीसंतने आयपीएलच्या अंतिम सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

श्रीसंतने या आयपीएलचे अधिकृत प्रसारक 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना सांगितले की, आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होईल. लखनौच्या संघाने १३ सामने खेळले असून १५ गुणांसह कृणाल पांड्याचा संघ गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर बंगळुरूचे १२ सामन्यांत सहा विजयासह १२ गुण आहेत. आरसीबीला देखील प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी अखेरचे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.

 प्लेऑफमधील उर्वरित ३ जागांसाठी ७ संघांमध्ये स्पर्धा
गतविजेत्या गुजरात टायटन्सने १८ गुणांसह प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे, तर १५ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. लखनौचा संघ १५ गुणांसह तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स १४ गुणांसह चौथ्या स्थानी स्थित आहे. श्रीसंतने केलेल्या भविष्यवाणीनुसार, लखनौ विरूद्ध आरसीबी असा अंतिम सामना व्हायचा असेल तर दोन्हीही संघांनी आगामी सामन्यांत मोठा विजय मिळवावा लागेल. याशिवाय इतर संघांवर देखील अवलंबून राहण्याची शक्यता आहे. 

IND vs PAK मालिकेसाठी पाकिस्ताननं सुचवली ३ देशांची नावं; BCCIनं भूमिका जाहीर करून दिला पूर्णविराम


 

Web Title: IPL 2023 final will be between Lucknow Super Giants and Royal Challengers Bangalore, says former India player S Sreesanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.