IPL 2023: भारत आणि RCBचा फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli) एबी डिव्हिलियर्सच्या 360 शोमध्ये मंगळवारी मनसोक्त गप्पा मारल्या. Mr. 360 एबी डिव्हिलियर्सने भारतीय फलंदाज कोहलीला अनेक प्रश्न विचारले. दोन्ही दिग्गजांनी एकमेकांशी क्रिकेटशी संबंधित अनेक अनुभव देखील शेअर केले. या चर्चेत कोहलीने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि संघातील वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा यांच्याबद्दलही अनेक खुलासे केले.
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबीने भारत आणि भारतीय लोकांचे कौतुक केले, मला भारतात यायला आवडते, असेही म्हटले. भारतात क्रिकेटबद्दल लोकांमध्ये खूप प्रेम आहे. डिव्हिलियर्स म्हणाला, मी फक्त १९ वर्षांचा असताना भारत दौऱ्यावर आलो होतो. पण आजही मला भारतात इतकं प्रेम मिळतं की ते इथे घरासारखं वाटतं. यानंतर कोहलीने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबतच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितले.
कोहलीने सांगितले की धोनी रनिंग बिटविन दी विकेट फार वेगवान आहे, पण एबी धोनीपेक्षा वेगवान होता. डिव्हिलियर्सनंतर धोनीची रनिंग बिटबिन दी विकेट सर्वात वेगवान आहे. चेतेश्वर पुजाराचे नाव सर्वात वाईट रनिंग बिटविन दी विकेट विकेट बॅट्समन म्हणून कोहलीने ठेवले. कोहलीने हे देखील सांगितले की तो २३ ऑक्टोबर २०२२ ची रात्र विसरलेला नाही. कारण त्या दिवशी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता.
कोहलीने शेवटच्या चेंडूवर नाबाद ८२ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात एकवेळ भारत पराभवाच्या उंबरठ्यावर होता, पण कोहलीने १९ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. कोहलीचे हे तेच षटकार आहेत जे त्याने हॅरिस रौफच्या चेंडूवर मारले होते. जे आजही लोकांच्या लक्षात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"