Join us  

IPL 2023: अव्वल गुजरातचं आव्हान परतवण्यासाठी चेन्नईने आखला मास्टरप्लॅन, धोनी बजावणार महत्त्वाची भूमिका

IPL 2023, GT vs CSK Qualifier 1: या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम फेरीचे तिकीट पक्के करण्याचा धोनीसेनेचा प्रयत्न असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी काहीतरी वेगळीच चाल खेळून हार्दिक पांड्याला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 4:00 PM

Open in App

आयपीएल २०२३ मधील पहिला क्वालिफायर सामना आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नईमधील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवाला लागेल. अशा परिस्थितीत पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत मुसंडी मारण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

गुजरात टायटन्सच्या संघाने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम फेरीचे तिकीट पक्के करण्याचा धोनीसेनेचा प्रयत्न असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी काहीतरी वेगळीच चाल खेळून हार्दिक पांड्याला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. मोठ्या सामन्यांमध्ये निर्णायक कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीचा या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याकडे किंवा प्रथम क्षेत्ररक्षणाची संधी आल्यास प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न असेल.

तसेच संघाच्या फलंदाजीच्या फळीत फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची भूमिका धोनी स्वत: बजावू शकतो. संपूर्ण स्पर्धेत डेथ ओव्हर्सपर्यंत फलंदाजीस येणं टाळणारा धोनी आज गरज भासल्यास वरच्या फळीत खेळू शकतो. धोनी नेहमी अशाच धक्कादायक चाली खेळत असतो. २०११ चा वनडे वर्ल्डकप कोण विसरू शकतो. त्यामुळे आज चेपॉकवरही धोनी अशीच काहीशी चाल खेळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर तो त्याचा मास्टर स्ट्रोक ठरेल.

संभाव्य संघ चेन्नई सुपरकिंग्स - ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एम.एस. धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.

गुजरात टायटन्स - रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन/विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवटिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, यश दयाल.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App