IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) भेदक मारा करताना दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्येच शस्त्र म्यान करायला लावले. शमीने आज ४-०-११-४ अशी अप्रतिम स्पेल टाकली आणि आयपीएलमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दिल्लीचे स्टार ढेपाळले असताना अमन खानने अर्धशतक झळकावताना गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अक्षर पटेल व रिपल पटेल यांनीही चांगली फटकेबाजी करून DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
W,W,W,W; पॉवर प्लेमध्ये 'हमी' मोहम्मद शमी! १९ निर्धाव चेंडू टाकून घेतल्या ४ विकेट्स
प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे असताना दिल्लीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. पहिल्याच षटकात शमीच्या भन्नाट चेंडूवर फिल सॉल्टला बाद झाला. त्यानंतर प्रियांम गर्गसोबत चुकलेल्या ताळमेळामुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नर दुसऱ्याच षटकात रन आऊट झाला. शमीच्या भेदक माऱ्यासमोर DCचे फलंदाज गांगरले होते आणि GTचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्याच फायदा उचलला. चांगले फटके मारणआऱ्या रिली रोसोवूला (८ ) शमीने बाद केले. त्याने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मनीष पांडेला आणि शेवटच्या चेंडूवर प्रियाम गर्ग ( १०) बाद केले. दिल्लीचा निम्मा संघ २३ धावांवर माघारी परतला.
आयपीएलमध्ये १००+ बळी टिपणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये साहाने नाव नोंदवले. त्याने ७८ झेल व २३ स्टम्पिंग केले आहेत. महेंद्रसिंग धोनीने १७८ ( झेल १३७ व ३६ स्टम्पिंग) आणि दिनेश कार्तिक १६९ ( १३३ झेल व ३६ स्टम्पिंग) हे आघाडीवर आहेत. अक्षर पटेल व अमन खान दिल्लीसाठी खिंड लढवताना दिसले. या दोघांची ५० धावांची भागीदारी मोहित शर्माने तोडली. अक्षर २७ धावांवर राशीदच्या हाती झेल देऊन माघारी परतला. अमन खान मात्र दटून राहिला आणि त्याने ४१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतकत पूर्ण करताना दिल्लीला शतकपार नेले. अमन आणि रिपल पटेल यांची २७ चेंडूंवरील ५३ धावांची भागीदारी राशीदने तोडली. अमन ४४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावांवर झेलबाद झाला. रिपल २३ धावांवर बाद झाला दिल्लीने ८ बाद १३० धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"