IPL 2023, GT vs DC Live : आजही गोंधळ! डेव्हिड वॉर्नर संतापून No Ball असूनही पेव्हेलियनमध्ये गेला; सहकाऱ्यावर भडकला

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : कालच्या ड्राम्यानंतर आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 07:49 PM2023-05-02T19:49:18+5:302023-05-02T19:56:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, GT vs DC Live Marathi : David Warner is run-out from a no-ball and Mohammed Shami is on fire, 2 wickets in 2 overs for him. Delhi Capitals 3 down on 16 runs | IPL 2023, GT vs DC Live : आजही गोंधळ! डेव्हिड वॉर्नर संतापून No Ball असूनही पेव्हेलियनमध्ये गेला; सहकाऱ्यावर भडकला

IPL 2023, GT vs DC Live : आजही गोंधळ! डेव्हिड वॉर्नर संतापून No Ball असूनही पेव्हेलियनमध्ये गेला; सहकाऱ्यावर भडकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : कालच्या ड्राम्यानंतर आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्ससमोरदिल्ली कॅपिटल्सचे आव्हान आहे. GT चा संघ १२ गुणांसह सध्या अव्वल स्थानावर आहे आणि त्यांनी विजयाची हॅटट्रिक साजरी केली आहे. दुसरीकडे DCची वाटचाल काही चांगली झालेली नाही आणि ते ८ सामन्यानंतर ४ गुणांसह अजूनही तळावर आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याच्या त्यांच्या आशा पुसटच आहेत, तरीही उर्वरित सर्व सामने जिंकून चमत्कार घडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 


मिचेल मार्शला आजारपणामुळे आज खेळता येणार नसल्याने दिल्लीला मोठा धक्का बसलाच होता, त्यात मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले. DC ने शून्य धावेवर विकेट गमावली. दुसऱ्याच षटकात डेव्हिड वॉर्नरकडून मोठी चूक झाली. प्रियाम गर्गने मारलेल्या चेंडू राशीद खानच्या हातात गेला, परंतु वॉर्नरने धाव घेण्यासाठी क्रिज सोडली. प्रियामने आधी हा बोलून नंतर नकार दिला अन् राशीदीने पळत येत वॉर्नरला रन आऊट केले. दिल्लीला ६ धावांवर दुसरा धक्का बसला.

रायली रोसोवूने चांगली फटके मारून आश्वासक चित्र निर्माण केले खरे, परंतु शमीच्या भन्नाट वेगासमोर तोही अपयशी ठरला. दोन चौकारांसह ८ धावांवर रोसोवून बाद झाला अन् दिल्लीने १६ धावांवर तिसरा फलंदाज गमावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title: IPL 2023, GT vs DC Live Marathi : David Warner is run-out from a no-ball and Mohammed Shami is on fire, 2 wickets in 2 overs for him. Delhi Capitals 3 down on 16 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.