IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्ससमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले. शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या आक्रमक फटकेबाजीनंतर विजय शंकरने ( Vijay Shankar) वादळ आणले. हार्दिकच्या जागी विजयला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. सुरुवातीला त्याचा संथ खेळ पाहून चाहते संतापले होते, परंतु अखेरच्या १२ चेंडूंत त्याने KKRच्या गोलंदाजांना चोपून काढले. त्या १२ चेंडूंत त्याने ४३ धावा कुटल्या.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वृद्धीमान साहा ( १७) आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली सुरुवात केली. पण, सुनील नरीनने धक्का दिला. गिल व साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूंत ५० धावा करताना गुजरातचा डाव सावरला.गिल ३९ धावांवर बाद झाला.
अभिमन मनोहर १४ धावा करून माघारी परतला. सुदर्शन व विजय शंकर यांनी दमदार खेळ करताना ३५ धावा जोडल्या. सुदर्शन ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर बाद झाला. विजयने नंतर मोर्चा
सांभाळताना मिलरसह १६ चेंडूंत नाबाद ५१ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २०व्या षटकात विजयने सलग तीन षटकार खेचले. त्याने अखेरच्या १२ चेंडूंत 4,1,4,2,6,4,6,0,6,6,6,1L अशा ४३ धावा कुटल्या. विजय २४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारासह नाबाद ६३ धावा केल्या. विजयची ही खेळी पाहून तो पुन्हा वर्ल्ड कप खेळण्याची तयारी करतोय की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये 3D खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश केला गेला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, GT vs KKR Live : 4,1,4,2,6,4,6,0,6,6,6,1L - Vijay Shankar smashed 46 runs in last 12 balls. He scored unbeatan 63* runs from 24 balls against KKR.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.