IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live :कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातली लढत कमालीची चुरशीची झाली. इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यरने GT च्या २०५ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात वादळी खेळी केली. पण, त्याची विकेट पडली अन् कर्णधार राशीद खानने मॅच फिरवली. राशीदने ( Rashid Khan) हॅटट्रिक घेताना KKRच्या तोंडचा घास हिसकावला होता. पण, क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काहीच सांगता येत नाही आणि याची प्रचीती आली. रिंकू सिंगने ( Rinku singh) अखेरच्या षटकात सलग ६ षटकार केचून एकहाती सामना फिरवला आणि KKRला रोहर्षक विजय मिळवून दिला.
रहमनुल्लाह गुरबाज ( १५) आणि एन जगदीशन ( ६) यांना सुनील नरीनने बाद केले. KKR नेही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वेंकटेश अय्यरला उतरवले अन् त्याने प्रभाव पाडला. वेंकटेश व कर्णधार नितीश राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना गुजरातचं टेंशन वाढवले. १४व्या षटकात अल्झारी जोसेफने ही जोडी तोडली. राणा २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली. मोहम्मद शमीने झेल टिपला. वेंकटेशने २६ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. कोलकाताला ३६ चेंडूंत ७३ धावांची गरज होती.
वेंकटेश ४० चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८३ धावांवर झेलबाद झाला. KKRला २४ चेंडूंत ५० धावा करायच्या होत्या. आंद्रे रसेल, सुनील नरीन आणि मागच्या सामन्यातील स्टार शार्दूल ठाकूर मैदानावर येणे बाकी असताना KKRसाठी हे आव्हान अवघड नव्हते. पण, राशीद खानने तीन चेंडूंत सामना फिरवला. त्याने या तिघांनाही सलग चेंडूंवर बाद करून आयपीएल २०२२ मधील पहिली हॅटट्रिक नोंदवली. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्याची चौथी हॅटट्रिक ठरली. त्याने कॅरेबियन प्रीमिअर लीग, बिग बॅश लीग आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात असा पराक्रम केला आहे. कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. युवराज सिंगने २००९मध्ये दोन, शेन वॉटसनने २००४मध्ये एक हॅटट्रिक नोंदवली होती.
६ चेंडूंत २९ धावांची गरज असताना उमेश यादवने एक धाव घेऊन रिंकू सिंगला स्ट्राईक दिली. रिंकूने सलग 5 षटकार खेचून रोमहर्षक विजय मिळवून दिला. कोलकाताने 7 बाद 207 धावा केल्या., रिंकूने 21 चेंडूंत 1 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 48 धावांची वादळी खेळी केली.
तत्पूर्वी, वृद्धीमान साहा ( १७) आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली सुरुवात केली. गिल ३९ धावांवर बाद झाला. सुदर्शन व विजय शंकर यांनी दमदार खेळ करताना ३५ धावा जोडल्या. सुदर्शन ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर बाद झाला. विजयने नंतर मोर्चा सांभाळताना मिलरसह १६ चेंडूंत नाबाद ५१ धावा जोडल्या. विजय २४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारासह नाबाद ६३ धावा केल्या. कोलकाताने ४ बाद २०४ धावा केल्या.
Web Title: IPL 2023, GT vs KKR Live : 6,6,6,6,6! Rinku Singh hit five consecutive sixes to win the match for KKR; Rashid Khan's hat-trick in vain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.