IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चांगली सुरूवात केली आहे. वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांनी आक्रमक फटके खेचले. गिलने सातत्य राखताना MS Dhoni चा मोठा विक्रम मोडला, परंतु KKRच्या सुनील नरीनने GT ला दोन मोठे धक्के दिले. एन जगदीसनने अफलातून झेल घेत GTला पहिला धक्का दिला.
'डेव्हिड माझं ऐकत असशील तर.... IPL खेळायला येऊ नकोस'; DCच्या तिसऱ्या पराभवानंतर दिग्गजाचा सल्ला
गतविजेत्या गुजरात टायटन्सन ( Gujarat Titans) संघाला आज कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागले आहे. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या सामन्यात राशीद खान GTचे नेतृत्व करतोय. हार्दिक आजारी पडला असल्याचे राशीदने सांगितले. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वृद्धीमान साहा आणि शुबमन गिल यांनी सुरुवात चांगली केली होती, परंतु KKR ने त्यांचा हुकमी एक्का सुनील नरीन याला गोलंदाजीला आणले. त्याला सुरुवातीलाच फटकेबाजी करून दडपण निर्माण करण्याचा साहाचा प्रामाणिक प्रयत्न होता. मात्र, जगदीशनने अप्रतिम रिटर्न झेल घेतला आणि साहाला १७ धावांवर माघारी जावे लागले. गिल व साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूंत ५० धावा करताना गुजरातचा डाव सावरला. गिलने आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा ओलांडताना सातत्य दाखवले.
गुजरात टायटन्स संघ - शुबमन गिल, वृद्धीमान सहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल टेवाटिया, अभिनव मनोहर, राशीद खान, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी
कोलकाता नाइट रायडर्स संघ - रहमनुल्लाह गुरबाझ, नितीश राणा, एन जगदीसन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दूल ठाकूर, सुनील नरीन, ल्युकी फर्ग्युसन, उमेश यादव, सुयष शर्मा, वरुण चक्रवर्थी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"