IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरलेल्या वेंकटेश अय्यरने आज गुजरात टायटन्सविरुद्ध वादळी खेळी केली. २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. पण, वेंकटेश व नितीश राणा यांनी शतकी भागीदारी केली. राणा बाद झाल्यानंतर वेंकटेश चांगला झोडत होता. २००८ मध्ये ब्रेंडन मॅक्युलमने KKRकडून शतक झळकावले होते आणि त्यानंतर वेंकटेश शतकाचा दुष्काळ संपवेल असे वाटत होते, परंतु थोडक्यात ते हुकले.
वृद्धीमान साहा ( १७) आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली सुरुवात केली. गिल ३९ धावांवर बाद झाला. सुदर्शन व विजय शंकर यांनी दमदार खेळ करताना ३५ धावा जोडल्या. सुदर्शन ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर बाद झाला. विजयने नंतर मोर्चा सांभाळताना मिलरसह १६ चेंडूंत नाबाद ५१ धावा जोडल्या. विजय २४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारासह नाबाद ६३ धावा केल्या. कोलकाताने ४ बाद २०४ धावा केल्या.
रहमनुल्लाह गुरबाज ( १५) आणि एन जगदीशन ( ६) यांना सुनील नरीनने बाद केले. KKR नेही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वेंकटेश अय्यरला उतरवले अन् त्याने प्रभाव पाडला. वेंकटेश व कर्णधार नितीश राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना गुजरातचं टेंशन वाढवले. वेंकटेश व राणा ही जोडी काही केल्या ऐकत नव्हती.. कर्णधार राशीद खान यालाही त्यांनी सोडले नाही आणि ५४ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. १४व्या षटकात अल्झारी जोसेफने ही जोडी तोडली. राणा २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली. मोहम्मद शमीने झेल टिपला. वेंकटेशने २६ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
कोलकाताला ३६ चेंडूंत ७३ धावांची गरज होती. २००८ नंतर KKRकडून कोणीतरी शतक झळकावेल असे वाटत असताना अल्झारीने डाव साधला. वेंकटेश ४० चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८३ धावांवर झेलबाद झाला. KKRला २४ चेंडूंत ५० धावा करायच्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, GT vs KKR Live : End of a crazy knock from Venkatesh Iyer. 83 runs from 40 balls with 8 fours and 5 sixes, missed The first KKR century since Brendon McCullum in 2008
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.