IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : रिंकू सिंगने ( Rinku Singh) आज गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात कमाल करून दाखवली. इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यरने चांगली फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणली होती. पण, GT चा कर्णधार राशीद खानने हॅटट्रिक घेताना मॅच फिरवली. ६ चेंडूंत २९ धावा हव्या असताना KKR हा सामना जिंकेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रिंकू सिंगला उमेश यादवने एक धाव घेत स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकून १,२,३ नव्हे तर सलग पाच षटकार खेचले अन् KKRला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी रिंकूला मिठी मारली अन् त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.
ऐकेकाळी सफाई कर्मचाऱ्याचं करायचा काम अन् आज विमानातून करतोय प्रवास; रिंकूचा संघर्ष
२०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार नितीश राणाने २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. राणा आणि वेंकटेश अय्यरने शतकी भागीदारी करून सामना खेचून आणला होता. वेंकटेश ४० चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८३ धावांवर झेलबाद झाला. KKRला २४ चेंडूंत ५० धावा करायच्या आणि राशीद खानने चेंडू हातात घेत आंद्रे रसेल, सुनील नरीन आणि शार्दूल ठाकूर यांना सलग चेंडूवर बाद करून आयपीएल २०२३ मधील पहिली हॅटट्रिक नोंदवली. ६ चेंडूंत २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने यश दयालच्या षटकात सलग ५ षटकार खेचून रोमहर्षक विजय मिळवून दिला. कोलकाताने ७ बाद २०७ धावा केल्या. रिंकूने २१ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ४८ धावांची वादळी खेळी केली.