IPL 2023, GT vs KKR Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला दुखापतींचे ग्रहण लागलेलं दिसतंय... चेन्नई सुपर किंग्सच्या कालच्या सामन्यात दीपक चहरला पहिल्याच षटकात हॅमस्ट्रींग दुखापत झाली अन् तो माघारी परतला. मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना सुरू होण्यापूर्वी सराव सत्रात बेन स्टोक्स व MIच्या जोफ्रा आर्चर यांना दुखापतीमुळे कालचा सामना खेळता आला नाही. CSK चा मोईन अली आजारी पडला अन् त्यालाही बाकावर बसावे लागले. त्यात आज गतविजेत्या गुजरात टायटन्सन ( Gujarat Titans) संघाला धक्का बसला. कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आजच्या सामन्यात खेळत नाहीए... कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या सामन्यात राशीद खान GTचे नेतृत्व करतोय आणि त्यानेच हार्दिकच्या अनुपस्थितीबाबत सांगितले.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राशीदने त्यावेळी हार्दिक का खेळत नाही, यामागचं कारण सांगितले. ''आम्हाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल, ही खेळपट्टी ताजीतवानी वाटतेय आणि आशा करतो की मोठी धावसंख्या उभारण्यात आम्ही यशस्वी होऊ आणि त्याचा बचावही करू. हार्दिक पांड्याला बरं वाटत नाही आणि त्याच्याबाबतीत आम्हाला कोणताच धोका पत्करायचा नाही. संघ म्हणून आम्ही आजही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू,''असे सांगून राशीदने पुढील मॅचमध्ये हार्दिक खेळण्याची आशा व्यक्त केली.
गुजरात टायटन्स संघ - शुबमन गिल, वृद्धीमान सहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल टेवाटिया, अभिनव मनोहर, राशीद खान, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी
कोलकाता नाइट रायडर्स संघ - रहमनुल्लाह गुरबाझ, नितीश राणा, एन जगदीसन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दूल ठाकूर, सुनील नरीन, ल्युकी फर्ग्युसन, उमेश यादव, सुयष शर्मा, वरुण चक्रवर्थी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, GT vs KKR Live : Why Hardik Pandya Is Not Playing IPL 2023 Match Against Kolkata Knight Riders, Adil Rashid give update
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.