Hardik Pandya vs Krunal Pandya, IPL 2023 GT vs LSG Live: स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सख्खे भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या च्या विरोधात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सध्याच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ १० पैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर लखनौचा संघ १० पैकी ५ सामने जिंकून तिसऱ्या स्थानी आहे. नाणेफेकीच्या वेळी दोन्ही भाऊ याबाबत काय म्हणाले ते वाचूया.
--
टॉस जिंकून कृणाल पांड्या म्हणाला, "आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आपापल्या बाजूने एके दिवशी संघाचे नेतृत्व करणं हे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. एकूणच विकेट सारखीच खेळेल. आमच्याकडे चांगली फलंदाजी आहे आणि आम्हाला एकूण धावसंख्येचा पाठलाग करण्याची संधी आहे. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहोत. तेच आम्हाला आजही करायचे आहे."
हार्दिक पांड्या म्हणाला, "माझ्यासाठी हा एक भावनिक दिवस आहे. आमच्या वडिलांना या गोष्टीचा अभिमान वाटला असता. हे पहिल्यांदाच घडत आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबाला याचा खूप अभिमान आहे. आज एक गोष्ट नक्की आहे की दौघांपैकी एक पांड्या आज नक्कीच जिंकेल. हे स्वतःला व्यक्त करण्याबद्दल आहे आणि परिणामाबद्दल काळजी करू नका. आम्ही आधी फलंदाजीच करणार होतो. मला जे हवे होते ते मिळाले. अपयशाची भीती मनात रेंगाळू शकते, परंतु आपल्याला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे."
लखनौ सुपर जायंट्स संघ: कृणाल पांड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान
गुजरात टायटन्स संघ: हार्दिक पांड्या (क), रिद्धिमान साहा, शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी