Shubman Gill Wriddhiman Saha Mohit Sharma, IPL 2023 GT vs LSG Live: गुजरातच्या संघाने आपली दमदार लय सुरूच ठेवत लखनौ सुपर जायंट्स संघाला ५६ धावांनी धूळ चारली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या नाबाद ९४ धावा आणि वृद्धिमान साहाच्या ८१ धावांच्या बळावर २ बाद २२७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या संघाला ७ बाद १७१ धावाच करता आल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉक (६१) आणि कायल मेयर्स (४८) यांनी लखनौला दमदार सुरूवात मिळवून दिली, पण मोहित शर्माने ४ बळी टिपत गुजरातला विजय मिळवून दिला.
२२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कायल मेयर्स आणि क्विंटन डी कॉक जोडीने लखनौला ६ षटकांत बिनबाद ७२ धावा करून दिल्या होत्या. त्यानंतर मात्र सामना हळूहळू फिरला. मोहित शर्माने कायल मेयर्सला बाद केले. त्याने ३२ चेंडूत ७ चौकार २ षटकारांसह ४८ धावा केल्या. दीपक हुडा (११), मार्कस स्टॉयनीस (४), निकोलस पूरन (३) यांनी नाराज केले. क्विंटन डी कॉकने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले. त्याने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावा केल्या. तो बाद झाल्यावर आयुष बडोनीने ११ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत २१ धावा केल्या. पण मोहित शर्माने लखनौच्या फलंदाजाना बांधून ठेवले. त्यामुळे लखनौला २० षटकांत ७ बाद १७१ धावाच करता आल्या. मोहित शर्माने २९ धावांत ४ बळी घेतले. शमी, राशिद आणि नूर या तिघांनी १-१ बळी टिपत त्याला चांगली साथ दिली.
गुजरातच्या संघाने तुफान फटकेबाजी केली. वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्स दोघांनाही गुजरातच्या फलंदाजांनी चोपून काढले. सलामीवीर वृद्धिमान साहाने दमदार सुरूवात मिळवून दिली. त्यामुळे गुजरातने पहिल्या ६ षटकांत ७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर वृद्धिमान साहाने २० चेंडूत तर शुबमन गिलने २९ चेंडूत अर्धशतक ठोकले. वृद्धिमान साहा १० चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ४३ चेंडूमध्ये ८१ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याही १५ चेंडूत १ चौकार २ षटकारांसह २५ धावा केल्या. त्यानंतर शुबमन गिलने नाबाद ९४ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर संघाला द्विशतकापार पोहोचवले. लखनौकडून मोहसीन खानने १ आणि आवेश खानने १ बळी टिपला.
Web Title: IPL 2023 GT vs LSG Live Mohit Sharma along with Wriddhiman Saha Shubman Gill shines in Gujarat Titans victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.