Wriddhiman Saha Hardik Pandya, IPL 2023 गुजरात टायटन्सचा वृद्धिमान साहा रविवारी चर्चेत आला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध साहाने शानदार खेळी केली. त्याने तुफानी धावा केल्या. पण याशिवाय त्याने आणखी एक अशी कामगिरी केली, ज्याने त्याच्याविषयीच्या चर्चांना अधिकच वेग आला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत २० षटकात २ गडी गमावून २२७ धावा केल्या. साहाने संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली. त्याने ४३ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. त्यानंतर जे घडलं त्यामुळे हार्दिक पांड्याही हसू आवरू शकला नाही.
नक्की काय घडलं?
पहिला डाव संपल्यानंतर गुजरातचा संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरला तेव्हा साहा तिथे नव्हता. त्याच्या जागी केएस भरत संघासाठी विकेटकीपिंग करण्यासाठी येणार होते, मात्र त्याला पंचांनी थांबवले. असे का घडले याचे स्पष्ट कारण नाही, मात्र खेळाडूंच्या बदलीची समस्या निर्माण झाली असावी, त्यामुळे पंचांनी परवानगी दिली नाही. भरत येत असताना गुजरातने या सामन्यात गिलच्या जागी अल्झारी जोसेफची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड केली. आणि भरत साहाच्या जागी येत होता. त्यामुळे भरतला पाहून पंच काही बोलले आणि आशिष नेहरा, आशिष कपूर पंचांशी बोलू लागले.
हार्दिकला हसू अनावर
या दरम्यान साहा ड्रेसिंग रूममध्ये आरामात बसला होता. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने साहाला तयार होण्यास सांगितले आणि तो लगेच किट आणि विकेटकीपिंगच्या गोष्टी घालून तयार झाला. पण घाईघाईत साहाला समजले नाही आणि त्याने पँट उलटी घातली. तो मैदानात आला तेव्हा पँटच्या पुढच्या बाजूला राहिलेले लोगो मागच्या बाजूला होते. कॅप्टन पांड्यानेही त्याला हे सांगितले आणि त्याला हसू अनावर झाले. बाकीचे खेळाडूही हसू लागले.
दोन षटकांनंतर बाहेर
मात्र, साहा दोन षटकेच बाद झाला. त्याच्या जागी केएस भरत पुन्हा विकेटकीपिंगसाठी आला. हे सर्व का घडले, याचे कोणतेही स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. या सामन्यात साहाने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच्याकडून अपेक्षा नाही. या खेळीमुळे साहाला कसोटी संघात आणण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
Web Title: IPL 2023 GT vs LSG watch wriddhiman saha wears trousers in reverse leaves hardik pandya mohd shami laughters
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.