Join us  

GT vs MI Live : अर्जुन तेंडुलकरने विकेट घेतली, गुजरात टायटन्सला चिटींग करण्यासाठी अम्पायरची साथ मिळाली अन्...

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मागील सामन्यात बेक्कार धुलाई झाल्यानंतरही रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरवर ( Arjun Tendulkar) विश्वास कायम ठेवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 7:51 PM

Open in App

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मागील सामन्यात बेक्कार धुलाई झाल्यानंतरही रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरवर ( Arjun Tendulkar) विश्वास कायम ठेवला. जोफ्रा आर्चरला आजारपणामुळे आजच्या सामन्यात पुन्हा मुकावे लागले. अर्जुनने मिळालेल्या संधीवर पुन्हा एकदा कमाल करून दाखवताना गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला. तिसऱ्याच षटकात अर्जुनने GTचा ओपनर वृद्धिमान साहा याची विकेट घेतली. पण, यावेळी अम्पायरने चिटींग केल्याचा प्रसंग घडला. 

मुंबई इंडियन्स आणि गतविजेते गुजरात टायटन्स यांच्यात आज अहमदाबाद येथे सामना रंगत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला... खेळपट्टीवर दव दिसत असल्याने हा निर्णय घेतल्याचे रोहितने सांगितले. जोफ्रा आर्चर आजारी पडल्याने आज खेळत नसल्याचे रोहितने सांगितले. रिली मेरेडिथचा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहेत. हृतिक शोकीनच्या जागी कुमार कार्तिकेय खेळणार आहे. मोहम्मद शमीची ही १००वी,तर वृद्धीमान साहाची १५०वी आयपीएल मॅच आहे.

अर्जुन तेंडुलकरला आजही पहिलं षटक दिलं गेलं अन् शुबमन गिल स्ट्राईकवर असल्याने नेटिझन्सनी मीम्सचा  पाऊस पाडला. शुबमन आणि सारा तेंडुलकर यांच्यातल्या अफेअर्सची नेहमी चर्चा रंगते आणि आज अर्जुन विरुद्ध शुबमन असा सामना रंगल्याने नेटिझन्सला आयती संधी मिळाली. अर्जुनने पहिल्या षटकात ४ धावा दिल्या. अर्जुनने त्याच्या दुसऱ्या षटकात साहाची विकेट मिळवून दिली. डावीकडे जाणाऱ्या चेंडूला साहाने छेडलं अन् बॅटची कड लागून तो यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती विसावला. 

साहा DRS घ्यायचा की नाही यासाठी गिलसोबत चर्चा करताना दिसला. पण, तोपर्यंत १५ सेकंदाचा वेळ संपलेला.. वेळ संपल्यानंतर साहाने DRSचा इशारा केला अन् अम्पायरने तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली. नियमानुसार १५ सेकंदाच्या आतच DRS घ्यायचा असतो, परंतु साहासाठी नियमाची मोडतोड केल्याचे सर्वांनी पाहिले. 

टॅग्स :आयपीएल २०२३अर्जुन तेंडुलकरवृद्धिमान साहागुजरात टायटन्स
Open in App