IPL 2023, GT vs MI Live : जोफ्रा आर्चर पुन्हा आजारी पडला; रोहित शर्माने दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, अर्जुन तेंडुलकरला... 

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्स आणि गतविजेते गुजरात टायटन्स यांच्यात आज अहमदाबाद येथे सामना रंगणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:05 PM2023-04-25T19:05:38+5:302023-04-25T19:11:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, GT vs MI Live Marathi : Mumbai Indians won the toss and decided to bowl first, Jofra Archer is not playing, Check Playing XI  | IPL 2023, GT vs MI Live : जोफ्रा आर्चर पुन्हा आजारी पडला; रोहित शर्माने दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, अर्जुन तेंडुलकरला... 

IPL 2023, GT vs MI Live : जोफ्रा आर्चर पुन्हा आजारी पडला; रोहित शर्माने दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, अर्जुन तेंडुलकरला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्स आणि गतविजेते गुजरात टायटन्स यांच्यात आज अहमदाबाद येथे सामना रंगणार आहे. Mumbai Indians विजयपथावर परतण्यासाठी सज्ज आहे, तर Gujrat Titans सलग दुसऱ्या विजयाच्या शोधात आहेत. कमकुवत गोलंदाजी विभाग ही दोन्ही संघांची डोकेदुखी ठरली आहे आणि त्यामुळे आज MI vs GT प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल करतात याची उत्सुकता आहे. 

मोहम्मद शमीने यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सहा विकेट्स घेतल्या आहेत आणि सर्वाधिक ६१ निर्धाव चेंडू फेकले आहेत. रोहित शर्माने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये राशीद खानविरुद्ध २९ चेंडूंत ४३ दावा केल्य आहेत आणि सहा सामन्यातं राशीदला हिटमॅनला तीनवेळा बाद करण्यात यश मिळाले आहे.  पॉवर प्लेमध्ये गुजरातचा एकतरी ओपनर बाद होतोच होतो आणि ४८ धावा ही आतापर्यंतची वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये १६ षटकार खेचले आहेत आणि आयपीएलमधील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. गुजरातला केवळ पाच षटकार खेचता आले आहेत. 

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला... खेळपट्टीवर दव दिसत असल्याने हा निर्णय घेतल्याचे रोहितने सांगितले. जोफ्रा आर्चर आजारी पडल्याने आज खेळत नसल्याचे रोहितने सांगितले. रिली मेरेडिथचा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहेत. हृतिक शोकीनच्या जागी कुमार कार्तिकेय खेळणार आहे. 

गुजरात टायटन्सचा संघ - शुबमन गिल, वृद्धीमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, मोहित शर्मा, राशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद 
 

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेया, नेहाल वधेरा, रिले मेरेडिथ, पीयुष चावला, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉर्फ

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, GT vs MI Live Marathi : Mumbai Indians won the toss and decided to bowl first, Jofra Archer is not playing, Check Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.