IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला पाणी पाजले.२०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना धापा टाकल्या. राशीद खान व नूर अहमद यांच्या फिरकीसमोर MI चे फलंदाज अपयशी ठरले. हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकता रोहित शर्माची मोठी विकेट मिळवली अन् त्यानंतर GT च्या गोलंदाजांनी दडपण निर्माण केले. त्या दडपणात MIचे फलंदाजा एकामागून एक माघारी परतले.
शुबमन गिलनंतर ( ५६) अभिनव मनोहर व डेविड मिलर यांन ७१ धावांची भागीदारी करताना गुजरातला दोनशेपार नेले. अभिनवने २१ चेंडूंत ४२ धावा, तर मिलरने २२ चेंडूंत ४६ धावा चोपल्या. राहुल तेवातियाने ५ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २० धावा करून गुजरातला ६ बाद २०७ धावांचा टप्पा गाठून दिला. गुजरातने शेवटच्या ७ षटकांत त्यांनी २ बाद १०४ धावांचा पाऊस पाडला. मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या यांनी पॉवर प्लेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. हार्दिकने दुसऱ्या षटकात रोहित शर्मा ( २) ला माघारी पाठवले. राशीद खानने ८व्या षटकात इशान किशनची ( १३) विकेट मिळवून दिली. इम्पॅक्ट प्लेअर तिलक वर्मा ( २) आज प्रभाव पाडू शकला नाही आणि राशीदने त्याला पायचीत केले.
नूर अहमदने ११व्या षटकात MIला दोन मोठे धक्के दिले. २६ चेंडूंत ३३ धावा करणाऱ्या कॅमेरून ग्रीनचा त्याने त्रिफळा उडवला अन् त्यानंतर टीम डेव्हिड फुलटॉस चेंडूवर भोपळ्यावर झेलबाद झाला. निम्मा संघ ५९ धावांवर माघारी परतल्याने मुंबईचा संघ अडचणीत सापडला. मुंबईला ५४ चेंडूंत १६.५५ च्या सरासरीने १४९ धावा करायच्या होत्या आणि आता सर्व मदार सूर्यकुमार यादववर होती. त्याने काही सुरेख फटकेही मारले, परंतु नूर अहमदने कॉट अँड बोल्ड करत ही विकेट मिळवली. सूर्या १२ चेंडूंत २३ धावांवर माघारी परतला. नूरने ४-०-३७-३ अशी, तर राशीदने ४-०-२७-२ अशी उत्तम गोलंदाजी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, GT vs MI Live Marathi : Noor Ahmed (4-0-37-3) & Rashid Khan ( 4-0-27-2), Mumbai Indians crumbling at the Narendra Modi Stadium - 90/6
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.