Mohit Sharma, IPL 2023: केसगळतीमुळे 'तो' डिप्रेशनमध्ये गेला, करिअरही कोलमडले... आता IPL मध्ये केलं धमाकेदार पुनरागमन

Mohit Sharma, IPL 2023 PBKS vs GT: मोहित शर्मा जो एकेकाळी महेंद्रसिंग धोनीचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. तो दोन वर्षांपूर्वी पंजाब संघाकडून IPL 2020 खेळला होता. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळून पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:02 AM2023-04-14T11:02:26+5:302023-04-14T11:03:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 GT vs PBKS Mohit Sharma dream debut after three years of depression career downfall | Mohit Sharma, IPL 2023: केसगळतीमुळे 'तो' डिप्रेशनमध्ये गेला, करिअरही कोलमडले... आता IPL मध्ये केलं धमाकेदार पुनरागमन

Mohit Sharma, IPL 2023: केसगळतीमुळे 'तो' डिप्रेशनमध्ये गेला, करिअरही कोलमडले... आता IPL मध्ये केलं धमाकेदार पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mohit Sharma, IPL 2023 PBKS vs GT: तुम्ही IPL चे चाहते असाल तर हे मोहित शर्मा हे नाव तुमच्यासाठी नवीन नसेल. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी हे नाव नवीन नाहीच. तो एक चतूर मध्यमगती गोलंदाज आहे. 2014 मध्ये मोहित शर्मा हा धोनीच्या नेतृत्वाखाली 23 विकेट्स घेऊन पर्पल कॅप विजेता होता. 2015 मध्ये महेंद्रसिंग धोनीने त्याला ५० षटकांचा विश्वचषक खेळायला दिला होता. भुवनेश्वर कुमार ऐवजी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. 2015 पासून भारतासाठी एकही सामना न खेळलेल्या मोहितचा आयपीएलमध्ये गेल्या दोन वर्षे कठीण काळ होता. पण अखेर त्याने यंदा पुनरागमन केले.

IPL 2020 मध्ये शेवटचा सामना खेळल्यानंतर मोहितने धमाकेदार पुनरागमन केले. विशेष म्हणजे, ज्या संघासोबत तो शेवटचा सामना खेळला होता. आता तीन वर्षांनंतर तो त्याच संघाविरोधात परतला. गुजरात टायटन्सकडून खेळत असलेल्या मोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध चार षटकांत अवघ्या १८ धावांत दोन विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण तो दोन वर्ष कुठे होता, जाणून घ्या...

----

मोहित शर्माने फॉर्मात असताना केस गळण्याचे कारण दिले होते. हरियाणाच्या या वेगवान गोलंदाजाने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, माझे केस येथे गळत आहेत आणि माझा आत्मविश्वास कमी होत आहे. हरियाणाच्या मोहित शर्माने एकूण 26 वन डे सामन्यात 31 विकेट्स आणि आठ टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 6 बळी घेतले आहेत.

आयपीएल 2019 आणि 2020 मध्ये एकच सामना खेळलेल्या मोहितला 2022 मध्ये गुजरातने आपला नेट बॉलर बनवले होते. मोहितची प्रबळ इच्छाशक्ती आणि चैतन्य त्याला प्रेरणा देत राहिले. दरम्यान, तो देशांतर्गत क्रिकेटही खेळत राहिला. पाठीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा त्याला सतत प्रेरित करत होते. त्यानंतर अखेर त्याला पंजाबविरूद्धच्या सामन्यात संघात घेण्यात आले आणि त्याने दमदार कामगिरी केली.

Web Title: IPL 2023 GT vs PBKS Mohit Sharma dream debut after three years of depression career downfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.