IPL 2023, GT vs RR Live : हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम, गुजरात टायटन्सकडून अखेरच्या षटकांत फटकेबाजी: राजस्थानची कसोटी

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live :  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:10 PM2023-04-16T21:10:47+5:302023-04-16T21:12:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, GT vs RR Live : Hardik Pandya's Big Record, Shubman Gill, David Miller played well,  Gujarat led by Miller - Manohar to reach 177 run | IPL 2023, GT vs RR Live : हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम, गुजरात टायटन्सकडून अखेरच्या षटकांत फटकेबाजी: राजस्थानची कसोटी

IPL 2023, GT vs RR Live : हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम, गुजरात टायटन्सकडून अखेरच्या षटकांत फटकेबाजी: राजस्थानची कसोटी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live :  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. RRच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. GTच्या धावगतीवर अंकुश ठेवताना RRने डावावर पकड घेतली. GTचा कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात मोठा विक्रम नोंदवला, शुबमन गिलने चांगला खेळ केला. अखेरच्या षटकांत अभिनव मनोहर व डेव्हिड मिलर यांनी फटकेबाजी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

 IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या संपूर्ण तक्ता

ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) पहिल्याच षटकात RRला यश मिळवून दिले. वृद्धीमान साहाचा पुल मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्याजागी हवेत उडाला. संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुराल हा झेल टिपण्यासाठी आले. संजू हा माझा झेल आहे असे ओरडत होता, परंतु त्याचे कुणीच ऐकले नाही. संजूच्या ग्लोव्ह्जमध्ये चेंडू विसावणार तितक्याच हेटमायर त्याला धडकला. चेंडू संजूच्या हातून निसटला अन् बोल्टने तो टिपला. शुबमन गिल चांगली फटकेबाजी करत होता, परंतु साई सुदर्शन ( २०) रन आऊट झाला. 


कर्णधार हार्दिक पांड्याने गिलला साथ दिली होती. पण, तोही मोठी खेळी करू शकला नाही. युझवेंद्र चहलने ही विकेट मिळवून दिली. हार्दिक २८ धावांवर माघारी परतला. त्याने या खेळीसह आयपीएलमध्ये २०००+ धावांचा पल्ला ओलांडला. आयपीएलमध्ये २०००+ धावा आणि ५०+ विकेट्स घेणारा हार्दिक सहावा खेळाडू ठरला.  शेन वॉटसन  ( ३८७४ धावा व ९२ विकेट्स), किरॉन पोलार्ड ( ३४१२ धावा व ६९ विकेट्स), रवींद्र जडेजा ( २५३१ धावा व १३८ विकेट्स), जॅक कॅलिस ( २४२७ धावा व ६५ विकेट्स), आंद्रे रसेल ( २०९२ धावा व ८९ विकेट्स) आणि हार्दिक ( २००४ धावा व ५० विकेट्स) असे हे खेळाडू आहेत. 


संदीप शर्माने RRला मोठे यश मिळवून दिले. शुबमन ४५ धावांवर ( ३४ चेंडू, ४ चौकार व १ षटकार) बाद झाला. राजस्थानच्या गोलंदाजांनी GTच्या धावगतीवर चांगले वेसण घातले होते. अभिनव मनोहर व डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले. १३ चेंडूंत २७ धावा करणाऱ्या मनोहरला झम्पाने बाद केले. मिलर ३० चेंडूंत ४६ धावांवर सीमारेषेवर झेलबाद झाला. गुजरातने ७ बाद १७७ धावा केल्या.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, GT vs RR Live : Hardik Pandya's Big Record, Shubman Gill, David Miller played well,  Gujarat led by Miller - Manohar to reach 177 run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.