IPL 2023, GT vs RR Live : विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video 

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live :  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 07:47 PM2023-04-16T19:47:50+5:302023-04-16T19:48:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, GT vs RR Live : Three guys coming together to catch a top edge from Wriddhiman Saha but Trent Boult gets the rebound from the collision, Video  | IPL 2023, GT vs RR Live : विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video 

IPL 2023, GT vs RR Live : विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live :  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले.  राजस्थान रॉयल्सचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना संजू सॅमसनच्या संघाला फायदा होण्याची आशा आहे आणि ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) पहिल्याच षटकात RRला यश मिळवून दिले. पण, ही विकेट विचित्र पद्धतीने मिळाली. वृद्धीमान सहाने चौकाराने त्याचे खाते उघडले. बोल्टने त्याच्या गोलंदाजीत बदल करताना थोडा आखूड चेंडू टाकला अन् त्यावर पुल मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्याजागी हवेत उडाला.

संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुराल हा झेल टिपण्यासाठी आले. संजू हा माझा झेल आहे असे ओरडत होता, परंतु त्याचे कुणीच ऐकले नाही. संजूच्या ग्लोव्ह्जमध्ये चेंडू विसावणार तितक्याच हेटमायर त्याला धडकला. चेंडू संजूच्या हातून निसटला अन् बोल्टने तो टिपला. असा विचित्र कॉट अँड बोल्ड प्रथमच झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, GT vs RR Live : Three guys coming together to catch a top edge from Wriddhiman Saha but Trent Boult gets the rebound from the collision, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.