एकतर्फी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सला त्यांच्याच मैदानावर तब्बल ९ गड्यांनी नमवले. प्रथम फलंदाजी केलेल्या राजस्थान'ला १७.५ षटकांत ११८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 'गुजरात'ने हे माफक लक्ष्य केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात १३.५ षटकात पार केले.
राजस्थानविरुद्धच्या शानदार विजयासह 'गुजरात'ने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. तर लखनौ अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर असून राजस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. बंगळुरु पाचव्या, मुंबई सहाव्या, तर पंजाब सातव्या स्थानी आहे. कोलकाता ८ गुणांसह आठव्या स्थानी आहे. तर हैदराबाद नवव्या आणि दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे.
आज मुंबई विरुद्ध चेन्नई-
चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील खूप मोठा सामना मानला जातो. या दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फळी आहे. सध्याचा खेळ पाहता मुंबई संघाचा फॉर्म जबरदस्त असून, त्यांचे पारडे या सामन्यात किंचित वरचढ आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत मुंबईने शानदार कामगिरीसह विजय मिळवला आहे. चेन्नईला मागच्या सामन्यात पावसामुळे प्रतिस्पर्ध्यासोबत अर्ध्या गुणावर समाधान मानावे लागले होते. शिवाय, त्याआधीचे दोन सामने त्यांनी गमावले आहेत. त्यामळे त्यांच्यावर नक्कीच दडपण असणार आहे.