IPL मधून आणखी एक भारतीय खेळाडू बाहेर, २ कोटी पाण्यात! आता २० लाखांच्या खेळाडूनं घेतली जागा

पंजाब किंग्जनं एका भारतीय युवा क्रिकेटपटूवर तब्बल २ कोटी रुपयांची बोली लावून संघात दाखल केलं होतं. पण आता तोच खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:18 PM2023-04-05T15:18:47+5:302023-04-05T15:20:05+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2023 gurnoor singh brar replace raj angad bawa in punjab kings | IPL मधून आणखी एक भारतीय खेळाडू बाहेर, २ कोटी पाण्यात! आता २० लाखांच्या खेळाडूनं घेतली जागा

IPL मधून आणखी एक भारतीय खेळाडू बाहेर, २ कोटी पाण्यात! आता २० लाखांच्या खेळाडूनं घेतली जागा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली-

पंजाब किंग्जनं एका भारतीय युवा क्रिकेटपटूवर तब्बल २ कोटी रुपयांची बोली लावून संघात दाखल केलं होतं. पण आता तोच खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा याच्यासाठी २ कोटी रुपये खर्चून पंजाब किंग्जनं आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं होतं. पण दुखापतीमुळे आता राज अंगद बावा यंदाच्या आयपीएलचा एकही सामना खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राजच्या जागी आता पंजाबनं २० लाख रुपयांत युवा खेळाडू गुरनूर सिंह ब्रार याला संघात दाखल करुन घेतलं आहे. 

राज अंगद बावाच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधून त्याला बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी संघात दाखल झालेल्या गुरनूर सिंह ब्रार यानं गेल्याच वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडण्यात गुरनूरला यश आलं.

राज बावानं गेल्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्याच सीझनमध्ये त्यानं आणखी एक सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळला होता. या दोन सामन्यांमध्ये राजला केवळ फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात त्यानं फक्त ११ धावा केल्या. यंदाच्या सीझनमध्ये पंजाबच्या पहिल्या सामन्यात राज बावा याला संधी मिळाली नव्हती. तर दुसऱ्या सामन्याआधीच दुखापतीमुळे राज संपूर्ण सीझनबाहेर गेला आहे.

अवघ्या २० लाखांत गुरनूर ब्रार संघात
राज बावाच्या जागी पंजाब किंग्जच्या संघात दाखल झालेला गुरनूर सिंग ब्रार यानं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तो ५ फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळला आहे. ज्यात त्यानं १२० च्या सरासरीनं १०७ धावा केल्या आहेत. तर ७ विकेट्स देखील मिळवल्या आहेत. 

पंजाब किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सना पराभूत केलं आहे. तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुवाहाटी येथे होणार आहे. 

Web Title: ipl 2023 gurnoor singh brar replace raj angad bawa in punjab kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.