IPL 2023, RR vs LSG : श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे आणि त्याच्याजागी भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार संजूने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये त्याचा क्लास पुन्हा एकदा दाखवला आहे. त्याने पाच सामन्यांत दोन अर्धशतकांसह १५७ धावा केल्या आहेत. पण, भारताचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) हा संजूपेक्षा चांगला फलंदाज असल्याचा दावा केला आहे.
तिला विसरलात ना? आयपीएलमध्ये पुन्हा तिची चर्चा, रोहित शर्माची IPL मधील पहिली मालकीण...
''जर तुम्ही भारतीय संघात स्वत:ला प्रस्थापित करण्याबद्दल बोललात, तर मला विश्वास आहे की केएल राहुल संजू सॅमसनपेक्षा खूप चांगला आहे. त्याने अनेक देशांमध्ये कसोटी सामने खेळले आहेत आणि शतके ठोकली आहेत. त्याने वन डे सामन्यांमध्ये सलामीवीर आणि मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आहे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही त्याने धावा केल्या आहेत,''असे सेहवाग LSG vs RR सामन्यापूर्वी म्हणाला.लोकेश राहुलनेआयपीएल २०२३ मध्ये पाच सामन्यांत एक अर्धशतकाह १५५ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट हा ११३.१४ असा राहिला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर टीकाही होतेय. रॉयल्सच्या संघात ट्रेंट बोल्ट हा एकच क्षमता असलेला गोलंदाज आहे आणि राहुल त्याच्यावर भारी पडेल, असेही वीरूला वाटते.
"केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने मागील सामन्यात धावा केल्या. होय, त्याचा स्ट्राइक रेट लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही, परंतु त्याचा फॉर्म हा एक चांगला संकेत आहे. राजस्थानकडे ट्रेंट बोल्टशिवाय दुसरा कोणताही चांगला वेगवान गोलंदाज नाही. तो खूप धोकादायक आहे. त्यांच्याकडे धोकादायक फिरकीपटू आहेत, परंतु राहुलने दीर्घकाळ फलंदाजी केली तर तो त्यांच्यावर नक्कीच भारी पडेल," असे मत माजी सलामीवीराने व्यक्त केले.
दरम्यान, बोल्टने नवीन चेंडूसह त्याच्या स्विंग आणि वेगाने राहुलला अडचणीत आणले आहे. गेल्या वर्षी डावखुऱ्या किवी वेगवान गोलंदाजाने राहुलला अप्रतिम इन स्विंगरवर बोल्ड केले. रॉयल्स पाच सामन्यांतून चार विजयांसह गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. LSG पाच सामन्यांतून तीन विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"