IPL 2023 RR vs PBKS LIVE Updates: पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाने प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ला १८८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण राजस्थानच्या गोलंदाजांना पंजाबच्या फलंदाजांना रोखता आले नाही. सॅम करन, जितेश शर्मा आणि शाहरूख खान या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 5 विकेट गमावून 187 धावा केल्या. आजच्या सामन्यात जर राजस्थानच्या संघाने १८८ धावांचे आव्हान १८.३ षटकांत पूर्ण केले, तर त्यांना RCBला धक्का देता येणार आहे. जाणून घ्या.
काय आहे गणित?
राजस्थानच्या संघाला १८८ धावांचे आव्हान मिळाले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना सध्या राजस्थानच्या संघाचा नेट रनरेट +०.१४० आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा नेट रनरेट +०.१८० आहे. विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर RCBचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे १४ गुण असून त्यांची एक मॅच शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आज जर राजस्थानने पंजाबला १८.३ षटकात पराभूत केले तर त्यांचा नेट रनरेट RCB पेक्षा जास्त होईल आणि त्याचा फायदा राजस्थानला होईल. कारण आज विजय मिळवल्यास राजस्थानचे देखील १४ गुण होतील आणि त्यांना RCB च्या पुढे जाण्याची संधी मिळेल.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, जितेश शर्मा, सॅम करन आणि शाहरुख खान मुळे पंजाब किंग्स 187 धावांची मजल मारू शकला. फलंदाजीला उतरलेल्या पंजाबची अतिशय वाईट सुरुवात झाली. दुसऱ्याच बॉलवर प्रभसिमरन सिंग बाद झाला. यानंतर शिखर धवन (१७), अथर्व तायडे (१९) आणि लियम लिव्हिंगस्टन (९) स्वस्तात बाद झाले. पण विकेटकिपर जितेश शर्माने संघाला सावरलं. त्याने 28 बॉलमध्ये 44 धावा केल्या. त्यानंतर शेवटी सॅम करन आणि शाहरुख खान जोडीने पंजाबला १८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. सॅम करनने ३१ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. तर २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक ३ बळी टिपले.
Web Title: IPL 2023 If Rajasthan Royals win in 18.3 overs then they will overtake RCB net run rate check this calculation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.