Will MS Dhoni Retire After IPL 2023? भारतीय संघाचा माजी आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) IPL 2023 नंतर निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये होम-अवे सामने होणार आहेत आणि धोनीला चेपॉकवर पून्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्साहात आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) चेपॉकवरील सामन्याचे तिकिट्स फूल झाले आहेत आणि नुकतंच या स्टेडियमवरील स्टँडला धोनीचे नावही देण्यात आले आहे. निवृत्तीच्या चर्चांमुळे माहिचे चाहते इमोशनल झाले आहेत आणि त्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( MI Captain Rohit Sharma) याने महत्त्वाचे विधान केले आहे.
अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का? रोहित शर्मा हसला अन् म्हणाला...; मार्क बाऊचरने दिली मोठी बातमी
धोनी हा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १०० विजय मिळवणारा एकमेव खेळाडू आहे आणि त्याने CSK ला चार जेतेपदं जिंकून दिली आहेत. मागील पर्वात CSK ने नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली होती, परंतु संघाची कामगिरी पाहून पुन्हा ती धोनीकडे देण्यात आली. पण, त्यांची कामगिरी काही खास झाली नाही. पण, यंदा बेन स्टोक्सच्या येण्याने चेन्नईची ताकद वाढली आहेच आणि धोनीनंतर तोच कर्णधार असेल अशी चर्चाही सुरू झाली आहे. त्यात आज रोहितला धोनीच्या अखेरच्या आयपीएलच्या चर्चेबाबत विचारण्यात आले.
महेंद्रसिंग धोनीने २३४ आयपीएल सामन्यांत ४९७८ धावा केल्या आहेत आणि १३५ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. रोहित म्हणाला,''मला याबाबत कल्पना नाही. अशी चर्चा मी मागील दोन-तीन वर्षांपासून एकतोय आणि धोनी त्या चर्चा उडवून लावतोय. तो अजूनही तंदुरुस्त आहे आणि तो पुढेही खेळू शकतो.''
चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"