Join us  

IPL 2023: आयपीएलच्या अंतिम सामन्यात आजही पावसाचा व्यत्यय? हवामान खात्याने दिली अशी अपडेट 

IPL 2023: काल रात्री अहमदाबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुजरात आणि चेन्नईच्या संघांमध्ये रंगणारा आयपीएलचा अंतिम सामना होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना आता आज रात्री खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 6:02 PM

Open in App

काल रात्री अहमदाबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुजरात आणि चेन्नईच्या संघांमध्ये रंगणारा आयपीएलचा अंतिम सामना होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना आता आज रात्री खेळवण्यात येणार आहे. मात्र कालप्रमाणेच आजही सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार नाही ना, याची चिंता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. दरम्यान, आता आज रात्रीच्या हवामानाबाबतहवामान खात्यानेच महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. मात्र काल मुसळधार पावसामुळे या सामन्यातील एकही चेंडू टाकला गेला नव्हता. आता आज खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबतची अपडेद दिली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज २९ मे रोजीही गुजरातच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम पावसाबरोबरच वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज ४० टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच संध्याकाळी सहाच्या सुमारास ढगाळ वातावरण राहील. तर ७ वाजल्यानंतर हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. दिवसाचा विचार केल्यास दुपारच्या वेळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्वच्छ उन पडले होते.

जर आज राखीव दिवशीही पाऊस पडला. तसेच सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही तर ती बाब धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स आणि त्यांच्या फॅन्ससाठी हा खूप निराशाजनक क्षण असेल. अशा परिस्थितीत साखळी फेरीत गुणतक्त्यात अव्वलस्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल. याचा अर्थ आयपीएलमधील गुणतालिकेत गुजरात टायटन्सचा संघ २० गुणांसह अव्वलस्थानी राहिला होता. त्यामुळे स्पर्धेतील नियमानुसार गुजरात टायटन्सला विजेते घोषित करण्यात येईल.  

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सचेन्नई सुपर किंग्सहवामान
Open in App