Join us  

फ्रँचायझींची वाट लागणार! IPL 2023 धमाकेदार करण्यासाठी नवा नियम; १५ खेळाडूंचा संघ ठेवावा लागणार

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 1:55 PM

Open in App

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. १० फ्रँचायझींसह आयपीएलचे हे सलग दुसरे पर्व असणार आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये Impact Player नियम फ्रँचायझींची वाट लावणार आहे. इम्पॅक्ट प्लेअर हा नियम केवळ भारतीय खेळाडूंसाठीच वापरता येणार आहे, परंतु जर एखादा संघ ४ पेक्षा कमी परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरला असेल तर त्या संघाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी खेळाडू उतरवता येणार आहे.

''फ्रँचायझीला सामना सुरू होण्यापूर्वी ११ मुख्य खेळाडूंसह ४ राखीव खेळाडू अशा १५ खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहे. या ४ राखीव खेळाडूंमध्ये एक परदेशी खेळाडू असेल, परंतु फ्रँचायझीने प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ परदेशी खेळाडू आधीच निवडले असलीत तर त्यांना पाचवा परदेशी खेळाडू उतरवता येणआर नसल्याचे,'' BCCI ने स्पष्ट केले.

नियम काय सांगतोय... 

  • कर्णधार इम्पॅक्ट प्लेअरची निवड करेल.
  • डावाच्या सुरुवातीला इम्पॅक्ट प्लेअर जाहीर करावा लागेल किंवा एक षटक संपल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट / बाद झाल्यानंतर  
  • गोलंदाजी करणारा संघ विकेट पडल्यानंतर षटकाच्या मध्येच इम्पॅक्ट प्लेअर खेळवू शकतो, परंतु त्याला ते षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मिळू शकत नाही. 
  • ज्या खेळाडूच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर मैदानावर उतरेल, त्या खेळाडूला नंतर संपूर्ण सामन्यात खेळता येणार नाही किंवा राखीव खेळाडू म्हणूनही मैदानावर उतरता येणार नाही.
  • इम्पॅक्ट प्लेअर हा कर्णधारासारखा वागू शकत नाही, इम्पॅक्ट प्लेअर जर जखमी झाला किंवा अचानक आजारी पडला तर राखीव खेळाडू मैदानावर उतरू शकतो. पण, अम्पायरला त्याची खात्री पटली तरच...  हा राखीव खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकत नाही.  
  • इम्पॅक्ट प्लेअर संपूर्ण ४ षटकं टाकू शकतो. संघाला प्लेइंग इलेव्हनसह ४ राखीव खेळाडूंची नावं जाहीर करावी लागतील आणि यापैकी १ खेळाडूच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरू शकतो.  
  • दोन्ही संघ इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करू शकतात, परंतु तसे करायलाच हवं अशी सक्ती नाही. 

  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२बीसीसीआय
Open in App