IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दुखापतीचं सत्र सुरूच आहे.. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराह व रिषभ पंत हे स्टार दुखापतीमुळे माघारी गेले अन् पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे केन विलियम्सनला माघार घ्यावी लागली. RCBचा रिसे टॉपली हाही दुखापतीमुळे माघारी परतला. त्यात राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) मोठा धक्का बसला आहे. RR चा सलामीवीर जोस बटलर ( Jos Buttler) पुढील सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जोस बटलर हा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणार नाही. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात शाहरूख खानचा अफलातून झेल बटलरने टिपला, परंतु त्या प्रयत्नात त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. इंग्लंडच्या कर्णधाराच्या बोटाला टाके पडले आहेत. त्याहीनंतर बटलर फलंदाजीला आला होता. त्याच्याजागी आर अश्विनने यशस्वी जैस्वालसह सलामीवीराची भूमिका बजावली होती. त्यनंतर बटलर फलंदाजीला आला होता. जोस बटलरने ११ चेंडूंत १९ धावा केल्या होत्या.
दरम्यान, शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने धावांचा डोंगर उभा केला. शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थान रॉयल्ससाठ अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला. अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच RRला धक्के दिले आणि त्यानंतर नॅथन एलिसने संजू सॅमसनच्या संघाला गोंधळात टाकले. PBKS ने रोमहर्षक विजय मिळवला. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवरील पहिल्याच आयपीएल सामन्याला प्रेक्षकांनीही चांगली उपस्थिती लावली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"