IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या दमदार सुरूवातीनंतर इडन गार्डनवर चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्सकडून यंदा खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) भात्यातील सर्व फटके आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध वापरले. उमेश यादवला त्याने स्क्वेअर लेगला, स्कूपने षटकार खेचला. शिवम दुबेनेही ( Shivam Dube) हात साफ केले आणि या दोघांनी १६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली.
कोलकाताच्या घरच्या मैदानावरील सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चाहत्यांनी स्टेडियम खचाखच भरलेले पाहायला मिळाले. इडन गार्डवर पिवळे वादळ आले होते. CSKचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी KKRच्या गोलंदाजांचा पॉवर प्लेमध्ये चांगला समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या सहा षटकांत ६० धावा चोपल्या. सुयश शर्माने ८व्या षटकात KKRला ७३ धावांवर पहिले यश मिळवून दिले. ऋतुराज २० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला. कॉनवेने ३४ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. वरुण चक्रवर्तीने त्याच्याच गोलंदाजीवर उडालेला कॉनवेचा झेल टाकला.
सुयशने CSKच्या अजिंक्य रहाणेला पायचीत केले होते, परंतु DRSनंतर अम्पायर्स कॉल कायम ठेवल्याने रहाणे नाबाद राहिला. १३व्या षटकात वरुणने पहिल्याच चेंडूवर कॉनवेची विकेट मिळवून दिली. ४० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांवर कॉनवे झेलबाद झाला. अजिंक्यसोबत त्याची ३८ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण, शिवम दुबेने त्याच षटकात दोन सलग षटकार खेचले. पुढच्या षटकात अजिंक्यने उमेश यादवचे पहिले तीन चेंडू ६,६,४ असे भिरकावले. अजिंक्यने स्कूपवर मारलेला षटकात अप्रतिम होता. उमेशच्या त्या षटकात २२ धावा आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, KKR vs CSK Live Marathi : 6, 6, 6, 6, 4, 1, 4,1,6,4 by CSK in the last 10 balls, Shivam Dube & Ajinkya Rahane on fire.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.