Join us  

IPL 2023, KKR vs CSK Live : चेन्नई सुपर किंग्सने अव्वल स्थान पटकावले, कोलकाता नाइट रायडर्सना घरच्या मैदानावर रडवले 

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाताच्या इडन गार्डनवर दमदार कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 11:23 PM

Open in App

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाताच्या इडन गार्डनवर दमदार कामगिरी केली. अजिंक्य रहाणे,  शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांच्या फटकेबाजीने कोलकाता नाइट रायडर्ससमोर २३६ धावांचे लक्ष्य उभे केले. IPL 2023 मधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. KKRच्या जेसन रॉयने आतषबाजी करून चाहत्यांना जॉय देण्याचा प्रयत्न केला, परंतु महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चतुराईसमोर सारेच फेल ठरले. चेन्नईने हा सामना जिंकून IPL 2023 Point Table मध्ये अव्वल स्थान पटकावले. 

अविश्वसनीय अजिंक्य रहाणे! २९ चेंडूंत २४५ च्या स्ट्राईक रेटने चोपल्या नाबाद ७१ धावा, Video

KKRचे दोन फलंदाज १ धावेवर माघारी परतले. सुनील नरीन व एन जगदीशन यांना अनुक्रमे आकाश सिंग व तुषार देशपांडेने माघारी पाठवले. इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी KKR चा डाव सावरला होता. दोन डावखुरे फलंदाज मैदानावर असल्याने धोनीने ८व्या षटकात मोईन अलीला गोलंदाजीला आणले आणि त्याने वेंकटेशला ( २०) LBW केले.  पण, जेसन रॉयने सलग तीन षटकार खेचून अलीवर दडपण वाढवले. पुढच्या षटकात रवींद्र जडेजाने KKRचा कर्णधार राणाला ( २७) बाद करून ४ बाद ७० धावा अशी अवस्था केली. 

जेसन रॉयची बॅट आज काही ऐकायचं नाव घेत नव्हती आणि त्याची फटकेबाजी पाहून KKRच्या चाहत्यांना 'जॉय' मिळत होता. जेसन व रिंकू सिंग यांनी २८ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. KKRला ४२ चेंडूंत ११६ धावा करायच्या होत्या आणि या दोन खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या होत्या. जेसनने १९ चेंडूंत अर्धशतक केले. १५व्या षटकात महीश तिक्षणाच्या गोलंदाजीवर जेसनने दोन सुरेख चौकार खेचले, परंतु CSKच्या गोलंदाजाने तिसऱ्या चेंडूवर त्याचा दांडा उडवला. जेसन २६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांत तंबूत परतला. KKRला ३० चेंडूंत ९९ धावा करायच्या होत्या. 

मथिशा पथिराणाने १७व्या षटकात आंद्रे रसेलची ( ९) विकेट मिळवून दिली आणि KKRवरील दडपण वाढले. १८ चेंडूंत ७२ धावांची गरज असताना रिंकूवर पुन्हा एकदा करिष्माई खेळी करण्याची जबाबदारी होती. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने सलग ५ षटकार खेचून एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता, आजही तशाच खेळाची आस चाहत्यांना लागली होती. धोनीचा DRS पुन्हा एकदा यशस्वी ठरला अन् डेव्हिड विजे ( १) तुषारच्या गोलंदाजीवर LBW झाला. १२ चेंडूंत ५९ धावांची गरज असताना तिक्षणाचे षटक महत्त्वाचे ठरणारे होते. त्याने उमेश यादवची  (४) विकेट मिळवून दिली आणि ३ धावा दिल्या. ६ चेंडू ५६ असे अशक्य लक्ष्य असल्याने KKRचा पराभव पक्का झाला होता.

रिंकूने ३३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. कोलकाताला ८ बाद १८६ धावाच करता आल्या आणि चेन्नईने ४९ धावांनी हा सामना जिंकला.

तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड ( ३५) आणि डेव्हॉन कॉनवे ( ५६)  यांनी ७३ धावांची भागीदारी रचली. अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या  दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. शिवम २१ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजाने ८ चेंडूंत १८ धावा चोपल्या. दोन चेंडूंसाठी महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला अन् स्टेडियमवर धोनी... धोनी... नावाचा जयघोष सुरू झाला. अजिंक्य २९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने ४ बाद २३५  धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इडन गार्डनवरीलही ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. CSKच्या इनिंग्जमध्ये आज १८ षटकार व १४ चौकारांचा पाऊस पडला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सअजिंक्य रहाणे
Open in App