IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी ७३ धावांची मजबूत भागीदारी रचली आणि त्यानंतर अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या मुंबईकरांची बॅट तळपली. कोलकाता नाइट रायडर्सच्या घरच्या मैदानावार MS Dhoni व चेन्नई सुपर किंग्सचेच समर्थक अधिक दिसली. इडन गार्डनवर पिवळी चादर पसरलेली दिसली अन् अधुनमधून KKRचा जांभळ्या जर्सीचे ठिपके दिसत होते. त्यामुळे CSKच्या फलंदाजांनी हे मैदान गाजवले. अजिंक्य व शिवम यांनी ३२ चेंडूंत ८५ धावा चोपल्या.
CSKचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी KKRच्या गोलंदाजांचा पॉवर प्लेमध्ये चांगला समाचार घेतला. सुयश शर्माने ८व्या षटकात KKRला ७३ धावांवर पहिले यश मिळवून दिले. ऋतुराज २० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला. १३व्या षटकात वरुणने पहिल्याच चेंडूवर कॉनवेची विकेट मिळवून दिली. ४० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांवर कॉनवे झेलबाद झाला. अजिंक्यसोबत त्याची ३८ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण, शिवम दुबेने त्याच षटकात दोन सलग षटकार खेचले. पुढच्या षटकात अजिंक्यने उमेश यादवचे पहिले तीन चेंडू ६,६,४ असे भिरकावले. अजिंक्यने स्कूपवर मारलेला षटकात अप्रतिम होता. उमेशच्या त्या षटकात २२ धावा आल्या.
आंद्रे रसेलच्या शॉर्ट बॉलवर अजिंक्यने मारलेला पूल लाजवाब होता. चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झालेल्या आवाजाने क्रिकेट चाहत्यांना तृप्त केले. अजिंक्यने २४ चेंडूंत,तर शिवमने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. खजरोलियाच्या यॉर्कवर शिवमने खणखणीत फटका मारला, परंतु जेसन रॉयने झेल टिपला. शिवम २१ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला आणि अजिंक्यसह ३२ चेंडूंत ८५ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. अजिंक्यने या षटकात मारलेला उल्टा सुपला पाहून सर्वच अवाक् झाले. रवींद्र जडेजाने ८ चेंडूंत १८ धावा चोपल्या.
दोन चेंडूंसाठी महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला अन् स्टेडियमवर धोनी... धोनी... नावाचा जयघोष सुरू झाला. धोनीचे फटके कॅमेरात कैद करण्यासाठी प्रेक्षकांनी मोबाईल बाहेर काढले. अजिंक्य २९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने ४ बाद २३५ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, KKR vs CSK Live Marathi : Shivam DUBE ( 50) & Ajinkya RAHANE ( 71*) ADDED 85 RUNS FROM JUST 32 BALLS, CSK post 235/4 Vs KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.