IPL 2023, KKR vs LSG Live : निकोलस पूरनने LSG ला तारले! KKRला ८.५ षटकांत जिंकावी लागेल मॅच

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live  Marathi : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सला प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी आज शेवटची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 09:19 PM2023-05-20T21:19:42+5:302023-05-20T21:19:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, KKR vs LSG Live  Marathi : Nicholas Poora 58 (30) with 4 fours and 5 sixes; KKR's have to chase 177 runs target in 8.5 Overs. | IPL 2023, KKR vs LSG Live : निकोलस पूरनने LSG ला तारले! KKRला ८.५ षटकांत जिंकावी लागेल मॅच

IPL 2023, KKR vs LSG Live : निकोलस पूरनने LSG ला तारले! KKRला ८.५ षटकांत जिंकावी लागेल मॅच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live  Marathi : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सला प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी आज शेवटची संधी आहे. कोलकाता नाइट रायडर्सवर त्यांना विजय मिळवण्याची गरज आहे. KKRही प्ले ऑफसाठी काठावर आहे आणि आज त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतर LSGचा डाव निकोलस पूरन व आयूष बदोनी या जोडीने सावरला अन् KKRसमोर तगडे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले. 


क्विंटन डी कॉक आणि करन शर्मा ( ३) ही जोडी सलामीला आली, परंतु तिसऱ्या षटकात हर्षित राणाने विकेट मिळवली. पण, प्रेरक मंकड आणि क्विंटन यांनी चांगली फटकेबाजी करून पॉवर प्लेमध्ये संघाला १ बाद ५४ धावांपर्यंत पोहोचवले. क्षेत्ररक्षण मोकळे होताच KKRला यश मिळाले. वैभव अरोराने ७व्या षटकात प्रेरकला ( २६) झेलबाद करून माघारी पाठवले आणि क्विंटनसह २५ चेंडूंत ४१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्याच षटकात मार्कस स्टॉयनिसही ( ०) बाद झाल्याने KKRने सामन्यावर पकड घेतली. 


कृणाल पांड्याला ( ९) बाद करण्यासाठी नितीश राणाने फिरकीपटू सुनील नरीनला गोलंदाजीला आणले अन् नरीनने तिसऱ्यांदा कृणालची विकेट मिळवून दिली. ११व्या षटकात सेट झालेल्या क्विंटनचा ( २८) फटका चूकला अन् वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलने झेल टिपला. LSG चा निम्मा संघ ७३ धावांत तंबूत परतला. मैदानावर आलेल्या निकोलस पूरनने पहिल्या तीन चेंडूंवर ४,४,६ अशी फटकेबाजी केली.  ( एका षटकात LSG ला दोन धक्के) KKR ने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुयश शर्माला आणले. पण, पूरनने त्याचे फटकेबाजीने स्वागत केले.


निकोलस पूरन आणि आयूष बदोनी यांनी LSGचा डाव सावरताना ४७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. नरीनने या जोडीला शांत ठेवले होते, परंतु त्याच्या चौथ्या षटकात आयुषने दमदार फटकेबाजी करून १४ धावा जोडल्या. त्याच प्रयत्नात बदोनी ( २५) धावांवर झेलबाद झाला. पूरनने पुढच्या षटकात षटकारासह २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात शार्दूलने टाकलेले पहिले दोन चेंडू षटकार खेचले आणि तिसऱ्या चेंडूवर त्याची विकेट पडली. पूरन ३० चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५८ धावांवर झेलबाद झाला. शार्दूलने त्याच षटकात रवी बिश्नोईचा ( २) त्रिफळा उडवला. LSG ने ८ बाद १७६ धावा केल्या.

चेन्नई सुपर किंग्स Play Offs मध्ये; क्वालिफायर १ मध्ये खेळणार का? पाहा गणित

लखनौ सुपर जायंट्ससमोर CSKला मागे टाकण्यासाठी 'कठीण' गणित; महत्त्वाचे समीकरण 

LSG vs KKR च्या निकालापूर्वीच IPLने २ संघांना दिली फायनलसाठी दोन संधी  

KKR ला ही मॅच ८.५ षटकांत जिंकावी लागेल, तरच ते प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहू शकतील. त्याशिवाय त्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून अनुक्रमे मुंबई इंडियन्स व रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल. या दोघांचे शेवटचे साखळी सामने उद्या होणार आहे आणि MI व RCB दोघांनी विजय मिळवल्यास LSGसोबत त्यांच्यात शर्यत लागेल. आज LSG पराभूत झाली, तर MI व RCBचा प्ले ऑफचा मार्ग त्यांच्या विजयानंतर मोकळा होईल. 

Web Title: IPL 2023, KKR vs LSG Live  Marathi : Nicholas Poora 58 (30) with 4 fours and 5 sixes; KKR's have to chase 177 runs target in 8.5 Overs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.