IPL 2023, KKR vs PBKS: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला!

IPL 2023, KKR vs PBKS, Live Updates: केकेआर आणि पंजाब किंग्ज सामन्याचे संपूर्ण अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 03:40 PM2023-04-01T15:40:35+5:302023-04-01T15:42:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 KKR vs PBKS Kolkata win the toss bowl decision Shikhar Dhawan forgot one name | IPL 2023, KKR vs PBKS: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला!

IPL 2023, KKR vs PBKS: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसरा रणसंग्राम कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात होत आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे यंदा केकेआरचं नेतृत्व नितीश राणा करत आहे. तर पंजाबच्या संघाचं नेतृत्व शिखर धवन करत आहे. 

दोन्ही संघांकडे दमदार खेळाडू. मात्र, मैदानावरील कामगिरीत मागे. पंजाबला अद्याप जेतेपदाची प्रतीक्षा. मागच्या सत्रात संघ सहाव्या स्थानी होता. बेयरेस्टो, लिव्हिंगस्टोन या जखमी खेळाडूंमुळे संघ चिंतेत आहेत. कोलकाताच्या संघाकडून आज खेळणाऱ्या चार परदेशी खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल, रहमनुल्ला गुरबाज, सुनील नरेन आणि टीम साऊदी यांचा समावेश आहे. तर पंजाब किंग्ज संघातील चार परदेशी खेळाडूंमध्ये सॅम करण, सिकंदर रजा, राजेपक्षे आणि नॅथन एलिस यांचा समावेश आहे. 

शिखर धवन एकाचं नावच विसरला
नाणेफेकीवेळी सुत्रसंचालक मुरली कार्तिकनं दोन्ही संघाच्या कर्णधारांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही संघांची माहिती त्यानं विचारली. यात कोलकाता नाइट राइडर्स संघाकडून आज कोणते चार परदेशी खेळाडू खेळणार आहेत? याची माहिती मुरली कार्तिकनं विचारली. त्यावर नितीश राणानं संघातील खेळाडूंची माहिती दिली. त्यानंतर शिखर धवन यालाही पंजाबच्या संघातील चार परदेशी खेळाडूंची माहिती विचारली असता त्यानं तीन खेळाडूंची नावं सांगितली. पण चौथ्या खेळाडूचं नावच त्याला आठवेना. शिखरनं सॅम करण, सिकंदर रजा आणि राजेपक्षे यांचं नाव घेतलं. पण त्यानं नॅथन एलिस या गोलंदाजाचं नावच आठवलं नाही. 

Web Title: IPL 2023 KKR vs PBKS Kolkata win the toss bowl decision Shikhar Dhawan forgot one name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.