Join us  

IPL 2023, KKR vs PBKS Live : वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला 

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दमदार कामगिरी करून वन डे वर्ल्ड कप साठी भारतीय संघात पुनरागमन करण्याचा निर्धार उमेश यादवने ( Umesh Yadav) व्यक्त केला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 4:58 PM

Open in App

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दमदार कामगिरी करून वन डे वर्ल्ड कप साठी भारतीय संघात पुनरागमन करण्याचा निर्धार उमेश यादवने ( Umesh Yadav) व्यक्त केला होता. कोलकाता नाइट रायडर्सच्या या गोलंदाजाने आज IPL 2023 मधील पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम केला. पंजाब किंग्सविरुद्ध विकेट घेत त्याने दिग्गज ड्वेन ब्राव्हो याचा विक्रम मोडला. 

कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून आज झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझा पदार्पण करतोय. आयपीएल खेळणारा तो पहिला झिम्बाब्वेचा खेळाडू आहे. प्रभसिमरन सिंगने पंजाबला स्फोटक सुरूवात करून दिली. प्रभसिमरनने १२ चेंडूंत २३ धावा केल्या. टीम साऊदीच्या षटकात प्रभसिमरनने दोन चौकार व १ षटकार खेचला, परंतु किवी गोलंदाजाने चतुराईने त्याची विकेट घेतली. भानुका राजपक्षाने पंजाबसाठी आक्रमक फटकेबाजी सुरू ठेवली अन् कर्णधार शिखर धवन एका बाजूने विकेट टिकवून खेळताना दिसला. राजपक्षाने KKR च्या गोलंदाजांची धुलाई करताना ३२ चेंडूंत  ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या आणि धवनसोबत त्याने ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. उमेश यादवने त्याची विकेट घेतली. 

आयपीएलमध्ये एका प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम उमेश यादवने केला. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध ३४ विकेट्स घेतल्या आहेत आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध ३३ विकेट्स घेणाऱ्या ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. सुनील नरीननेही पंजाब किंग्सविरुद्ध ३२ विकेट्स घेतल्या आहेत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सपंजाब किंग्स
Open in App