IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सला आजच्या सामन्यात यजमान कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध फार समाधानकारक सुरूवात करता आली नाही. पॉवर प्लेमध्ये त्यांनी आघाडीचे तीन फलंदाज गमावले. हर्षिल राणआ हा सप्राईज पॅकेज ठरला अन् यष्टिरक्षक रहमनुल्लाह गुरबाजने अप्रतिम झेल घेतला.
कोलकाताने मागील सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे, पण पुढील चारही सामने त्यांना जिंकावे लागणार आहेत. आज त्यांच्यासमोर दहा गुणांसह आघाडीवर असलेल्या पंजाबचे आव्हान आहे. पंजाबने १० पैकी पाच सामने जिंकले आहेत, परंतु मागील सामन्यांत त्यांना हार मानावी लागली होती. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने पहिल्याच षटकात वैभव अरोराला तीन चौकार खेचून चांगली सुरुवात करून दिली. पण, दुसऱ्याच षटकात हर्षित राणाने PBKSला धक्का दिला. प्रभसिमरन ( १२) स्टेप आऊट होऊन पुढे येण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक रहमनुल्लाह गुरबाजच्या हाती झेलबाद झाला.
आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
मौसम बिगडनेवाला है...! सर्व संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा Points Table
'गडबडीत उलटी पँट घालून मैदानात उतरलो'; वृद्धिमान साहाने सांगितले यामागचे नेमके कारण!
तू कोण, याने फरक पडत नाही! रवी शास्त्री यांचे MI कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं विधान
हर्षितने त्याच्या पुढच्या षटकात आणखी एक विकेट घेताना भानुका राजपक्षाला भोपळ्यावर माघारी जाण्यास भाग पाडले. पण, लिएम लिव्हिंगस्टोनने वातावरण पुन्हा बदलले अन् आंद्रे रसेलला त्याने सलग तीन चौकार खेचले. त्याला रोखण्यासाठी KKR ने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थीला आणले अन् त्याने लिव्हिंगस्टोनला ( १५) पायचीत केले.
Web Title: IPL 2023, KKR vs PBKS Live Marathi : An excellent grab from Rahmanullah Gurbaz,Harshit Rana is on fire, 2 wickets in 2 balls, Liam Livingstone dismissed for 15 in 9 balls, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.