IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सोमवारी पंजाब किंग्सवर रोमहर्षक विजय मिळवला. इडन गार्डनवरील या विजयासह कोलकाताने IPL 2023 Point Tabel मध्ये १० गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. PBKSची मात्र आता प्ले ऑफमध्ये जाण्याच्या मार्गात अडचण निर्माण झाली आहे. KKRचा कर्णधार नितीश राणाचे अर्धशतक या सामन्यात महत्त्वाचे ठरले, तत्पूर्वी फिरकी गोलंदाजांनी चांगला मारा केला होताच. आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांची २६ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी निर्णायक ठरली अन् रिंकूने अखेरच्या चेंडूवर चौकार मारून मॅच जिंकवली.
गुरबाज व इम्पॅक्ट प्लेअर जेसन रॉय यांनी KKR ला चांगली सुरुवात करून देताना पंजाबच्या जलदगती गोलंदाजांवर आक्रमण केले. पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या नॅथन एलिसने PBKSला पहिले यश मिळवून देताना गुरबाजला ( १५) पायचीत पकडले. KKR ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ५२ धावा केल्या. हरप्रीत ब्रारने ८व्या षटकात रॉयची ( ३८) महत्त्वाची विकेट मिळवून दिली. कर्णधार नितीश राणा फलंदाजीला पुढच्या क्रमांकावर आला अन् त्याने लिएम लिव्हिंगस्टोनच्या ११व्या षटकात १६ धावा चोपून KKRवरील दडपण हलकं केलं. राणा व वेंकटेश अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५१ धावा जोडताना पंजाबच्या हातून सामना खेचून नेला. राहुल चहरने १४व्या षटकात वेंकटेशची ( ११) विकेट घेतली.
कोलकाताने १५ षटकांत २ बाद १२२ धावा केल्या होत्या आणि त्यांना अखेरच्या ५ षटकांत ५८ धावा करायच्या होत्या. नितीश राणाने ३७ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर राहुल चहरला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात नितीशने उत्तुंग फटका मारला अन् लिएम लिव्हिंगस्टोनने चांगला झेल घेतला. नितीश ३८ चेंडूंत ६ चौकार १ षटकारासह ५१ धावांवर माघारी परतला. चहरने ४-०-२३-२ अशी चांगली स्पेल टाकली. १८ चेंडूंत ३६ धावा KKR ला करायच्या होत्या अन् आंद्रे रसेल व रिंकू सिंग मैदानावर होते. त्यांना नशीबानेही साथ दिली अन् काही आयत्या धावाही मिळाल्या.
आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
तू कोण, याने फरक पडत नाही! रवी शास्त्री यांचे MI कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं विधान
गुर'बाझ' की नजर! चेंडू सोडला अन् झेप घेत पकडलाही, पाहा अफलातून Video
सॅम करनने टाकलेल्या १९व्या षटकात आंद्रे रसेलने ३ खणखणीत षटकार खेचून २० धावा जोडल्या अन् ६ चेंडूंत ६ धावा असा सामना आला. अर्शदीपने पहिल्या दोन चेंडूवर एक धाव दिली. रिंकू स्ट्राईकवर आला अन् त्याने १ धाव घेत रसेलला स्ट्राईल दिली. रसेलने दोन धावा काढल्याे २ चेंडू २ धावा अशी मॅच आली. पाचवा चेंडू चुकला अन् यष्टिरक्षकाच्या हातात गेला. रिंकू एक धाव घेण्यासाठी पळाला अन् नॉन स्ट्रायकर एंडला रसेल रन आऊट झाला. २३ चेंडूत ४३ धावा त्याने केल्या. रिंकूने चौकार खेचून कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. कोलकाताने ५ विकेट्सने सामना जिंकला. रिंकू १० चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला.