IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सचे फलंदाज एकामागून एक माघारी परतत असताना कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) चांगला खेळला... कोलकाता नाइट रायडर्सच्या फिरकीपटूंनी आज कमाल करून दाखवली. वरुण चक्रवर्थीने २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. यष्टिरक्षक रहमनुल्लाह गुरबाज याची आज PBKS च्या फलंदाजांनी कॅच प्रॅक्टीस करून घेतली.
शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने पहिल्याच षटकात वैभव अरोराला तीन चौकार खेचून चांगली सुरुवात करून दिली. पण, दुसऱ्याच षटकात हर्षित राणाने PBKSला धक्का दिला. प्रभसिमरन ( १२) स्टेप आऊट होऊन पुढे येण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक रहमनुल्लाह गुरबाजच्या हाती झेलबाद झाला. ( पाहा अफलातून झेल ) हर्षितने त्याच्या पुढच्या षटकात आणखी एक विकेट घेताना भानुका राजपक्षाला भोपळ्यावर माघारी जाण्यास भाग पाडले. पण, लिएम लिव्हिंगस्टोनने वातावरण पुन्हा बदलले अन् आंद्रे रसेलला त्याने सलग तीन चौकार खेचले. त्याला रोखण्यासाठी KKR ने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थीला आणले अन् त्याने लिव्हिंगस्टोनला ( १५) पायचीत केले. पॉवर प्लेमध्ये पंजाबने ५३ धावांवर ३ विकेट्स गमावल्या.
जितेश शर्मा व शिखर धवन यांनी संयमी खेळ करून पंजाबला १० षटकांत ३ बाद ८२ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३८ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. १३व्या षटकात वरुणच्या चेंडूवर लेट कर मारण्याच्या प्रयत्नात जितेश ( २१) यष्टिरक्षक गुरबाजच्या हाती झेल देऊन माघारी परतला. धवन एका बाजूनं विकेट टिकवून ठेवत खेळत होता. KKRचा कर्णधार नितीश राणा गोलंदाजीला आला अन् त्याने गब्बरची विकेट मिळवली.
आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
तू कोण, याने फरक पडत नाही! रवी शास्त्री यांचे MI कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं विधान
धवन ४७ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५७ धावा केल्या. विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये ५० अर्धशतकं झळकावणारा शिखर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. ऋषी धवन ( १९) व सॅम कुरन ( ४) यांना अनुक्रमे चक्रवर्थी व सुयश शर्माने बाद केले. हरप्रीत ब्रार ( १७*) व शाहरुख खान ( २१*) यांनी संघाला ७ बाद १७९ धावा उभारून दिल्या.
Web Title: IPL 2023, KKR vs PBKS Live Marathi : Shikhar Dhawan's 50th half-century; Shikhar Dhawan scored 57 in 47 balls with 9 fours and a six, Punjab Kings 179/7
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.