Join us  

IPL 2023, KKR vs PBKS Live : अरे, हे काय! पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी सोडलं मैदान; जाणून घ्या कारण

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १९१ धावांचा डोंगर उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 6:13 PM

Open in App

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १९१ धावांचा डोंगर उभा केला. भानुका राजपक्षाने दमदार फलंदाजी केली आणि शिखर धवनने संयमी खेळीने साथ दिली. दुसरा डाव सुरू करण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर उतरले, परंतु त्यांना मैदान सोडावे लागले. यामागे एक महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. 

ऐकेकाळी सफाई कर्मचाऱ्याचं करायचा काम अन् आज विमानातून करतोय प्रवास; २५ वर्षीय खेळाडूची संघर्षगाथा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पंजाब किंग्सने आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ( PBKS vs KKR) जी सुरूवात केली होती, ती पाहता २००+ धावा निश्चित वाटत होत्या. पण, कोलकाताच्या गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत चांगली कामगिरी करून दाखवली अन् पंजाबच्या धावांना ब्रेक लावला. भानुका राजपक्षाचे अर्धशतक अन् शिखर धवनची संयमी खेळी वगळल्यास पंजाबचे अन्य फलंदाज फार कमाल दाखवू शकले नाहीत. राजपक्षाने KKR च्या गोलंदाजांची धुलाई करताना ३२ चेंडूंत  ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या आणि धवनसोबत ( ४०) त्याने ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. जितेश शर्माने झटपट धावांचा सपाटा लावला आणि ११ चेंडूंत २१ धावा चोपल्या.सॅम करन व  सिकंदर रझा ( १६) ही जोडी पंजाबला दोनशेपार नेईल असे वाटत असताना सुनील नरीनने झिम्बाब्वेच्या खेळाडूला बाद केले. पंजाब किंग्सने २० षटकांत ५ बाद  १९१ धावा केल्या. करन १७ चेंडूंत २६ धावांवर, शाहरूख ११ धावांवर नाबाद राहिला. स्टेडियमवरील लाईट्स बंद पडल्यामुळे दुसरा डाव थोडा उशीरा सुरू झाला. खेळाडूंना मैदानावर येऊन पुन्हा माघारी जावं लागलं. रहमनुल्लाह गुर्बाजने पहिल्या षटकात खणखणीत षटकार खेचला. पण, मनदीप सिंगला ( २) दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने माघारी जाण्यास भाग पाडले. अर्शदीपने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनुकूल रॉयला ( ४) बाद केले. २ बाद १७ अशा कात्रित सापडलेल्या KKR ने वरुण चक्रवर्थीच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वेंकटेश अय्यरला मैदानावर उतरवले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३पंजाब किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App