IPL 2023, KKR vs PBKS Live : पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले

कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने १२ चेंडूंत २३ धावा करताना आक्रमक सुरूवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 05:15 PM2023-04-01T17:15:44+5:302023-04-01T17:16:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, KKR vs PBKS Live : Punjab Kings post the total of 191/5 runs in 20 overs. Bhanuka scored 50, Shikhar scored 40 runs. Excellent finish by Sam Curran.   | IPL 2023, KKR vs PBKS Live : पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले

IPL 2023, KKR vs PBKS Live : पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पंजाब किंग्सने आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ( PBKS vs KKR) जी सुरूवात केली होती, ती पाहता २००+ धावा निश्चित वाटत होत्या. पण, कोलकाताच्या गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत चांगली कामगिरी करून दाखवली अन् पंजाबच्या धावांना ब्रेक लावला. पंजाबने मोक्याच्या क्षणी विकेट टाकल्याने त्यांना अपेक्षित धावसंख्या उभी करता आली नाही. भानुका राजपक्षाचे अर्धशतक अन् शिखर धवनची संयमी खेळी वगळल्यास पंजाबचे अन्य फलंदाज फार कमाल दाखवू शकले नाहीत. 

वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला 

कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने १२ चेंडूंत २३ धावा करताना आक्रमक सुरूवात करून दिली. टीम साऊदीच्या षटकात त्याने २ चौकार व १ षटकार खेचला, परंतु किवी गोलंदाजाने चतुराईने विकेट घेतली. भानुका राजपक्षाने KKR च्या गोलंदाजांची धुलाई करताना ३२ चेंडूंत  ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या आणि धवनसोबत त्याने ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. उमेश यादवने त्याची विकेट घेतली. आयपीएलमध्ये एका प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम उमेश यादवने केला. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध ३४ विकेट्स घेतल्या आहेत. 


पंजाब किंग्सकडून  अर्धशतक झळकावणारा भानुका राजपक्षा हा तिसरा श्रीलंकन खेळाडू ठरला. यापूर्वी कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांनी ही कामगिरी केली होती. जितेश शर्माने झटपट धावांचा सपाटा लावला आणि ११ चेंडूंत २१ धावा चोपल्या. अनुभवी गोलंदाज टीम साऊदीने त्याला चतुराईने बाद केले. पदार्पणवीर सिकंदर रझाने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप रझाने गाजवले होते आणि त्यामुळेच त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. संयमी खेळ करणाऱ्या धवनला ( ४०) वरूण चक्रवर्थीने त्रिफळाचीत केले. धवनच्या विकेटनंतर आयपीएलमधील महागडा खेळाडू सॅम करन मैदानावर आला. 

करन व रझा ही जोडी पंजाबला दोनशेपार नेईल असे वाटत असताना सुनील नरीनने मोक्याच्या क्षणी झटका दिला. रझा १६ धावांवर झेलबाद झाला.  शाहरून खानने अखेरच्या षटकांत काही सुरेख फटके मारताना पंजाबला मोठा टप्पा गाठून दिला. करननेही वावराच्या बाहेर चेंडू पाठवून धावांत भर घातली. पंजाब किंग्सने २० षटकांत ५ बाद  १९१ धावा केल्या. शार्दूलने ४ षटकांत ४३ धावा दिल्या. टीम साऊदीने दोन विकेट्स घेतल्या, परंतु त्याच्या ४ षटकांत ५४ धावा दिल्या. करन १७ चेंडूंत २६ धावांवर, शाहरूख ११ धावांवर नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: IPL 2023, KKR vs PBKS Live : Punjab Kings post the total of 191/5 runs in 20 overs. Bhanuka scored 50, Shikhar scored 40 runs. Excellent finish by Sam Curran.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.