अडखळती सुरुवात आणि डावाच्या मध्यावर ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी केलेल्या तुफानी शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. कोलताना नाईटरायडर्सने २० षटकांमध्ये ७ बाद २०४ धावा फटकावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
चार वर्षांनंतर घरच्या मैदानात पहिला सामना खेळत असलेल्या कोलकाता नाईटरायडर्सला बंगळुरूविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नव्हती. बंगळुरूने नाणेफेक जिंकत कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यावर चौथ्याच षटकात डेव्हिड विलीने केकेआरला जबर धक्के दिले. विलीने डावातील चौथ्या षटकात व्यंकटेश अय्यर (३) आणि मनदीप सिंग (०) यांची पाठोपाठच्या चेंडूवर दांडी गुल करत इडन गार्डनवर खळबळ उडवली. त्यानंतर कर्णधार नितीश राणाही स्वस्तात माघारी परतला.
५० धावा पूर्ण होण्याआधीच त्यांचे ३ खंदे फलंदाज माघारी परतले आहेत. एकीकडे बंगळुरूच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांना टिकून खेळणेही कठीण झालेले असताना रहमतुल्ला गुरबाझ एकट्यानेच खिंड लढवताना दिसला. इतर फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडत असताना गुरबाझने, चौकार षटकारांची आतशबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकवीर रहमतुल्लाह गुरबाझ आणि आंद्रे रसेल पाठोपाठ बाद झाल्याने कोलकाताची अवस्था ५ बाद ८९ अशी अवस्था झाली.
त्यानंतर शार्दुल ठाकूरने तुफानी प्रतिहल्ला चढवत केकेआरला सामन्यात कमबॅक करून दिले. दरम्यान, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत शार्दुलने आपले अर्धशतक अवघ्या २० चेंडूत पूर्ण केले. शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह (४६ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करत कोलकात्याला १९० धावांच्या पार मजल मारून दिली.
दरम्यान, रिंकू सिंह ४६ धावा काढून हर्षल पटेलची तर शार्दुल ठाकूर २९ चेंडूत ६८ धावांची झंझावाती खेळी करून सिराजशी शिकार झाला. या खेळीदरम्यान, त्याने ९ चौकार आणि ३ षटकार खेचले. अखेरच्या षटकात उमेश यादवने कोलकात्याला दोशनेपार मजल मारून दिली. बंगळुरूकडून