IPL 2023, KKR Vs RCB: ई़डन गार्डनवर शार्दुल ठाकूरचे ‘शोले’, तुफानी अर्धशतक, १० चेंडूत कुटल्या ४६ धावा 

IPL 2023, KKR Vs RCB: रहमतुल्लाह गुरबाझ आणि आंद्रे रसेल पाठोपाठ बाद झाल्याने ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूरने तुफानी प्रतिहल्ला चढवत केकेआरला सामन्यात कमबॅक करून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 09:02 PM2023-04-06T21:02:30+5:302023-04-06T21:03:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, KKR Vs RCB: Shardul Thakur's 'Sholay', Stormy Half-Century | IPL 2023, KKR Vs RCB: ई़डन गार्डनवर शार्दुल ठाकूरचे ‘शोले’, तुफानी अर्धशतक, १० चेंडूत कुटल्या ४६ धावा 

IPL 2023, KKR Vs RCB: ई़डन गार्डनवर शार्दुल ठाकूरचे ‘शोले’, तुफानी अर्धशतक, १० चेंडूत कुटल्या ४६ धावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आघाडीची फळी कोलमडल्याने अडचणीत सापडलेल्या कोलकाता नाईटरायडर्सचा डाव रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी सावरला. अर्धशतकवीर रहमतुल्लाह गुरबाझ आणि आंद्रे रसेल पाठोपाठ बाद झाल्याने ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूरने तुफानी प्रतिहल्ला चढवत केकेआरला सामन्यात कमबॅक करून दिले. दरम्यान, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत शार्दुलने आपले अर्धशतक अवघ्या २० चेंडूत पूर्ण केले. 

शार्दुल ठाकूर फलंदाजीस आला तेव्हा कोलकाता नाईटरायडर्सची अवस्था ५ बाद ८९ अशी झाली होती. त्याचवेळी शार्दुलने खेळपट्टीवर उतरताच टॉप गिअर टाकला. त्याने १३ व्या षटकात १९, १४ व्या षटकात ११ आणि १५ व्या षटकात १६ अशा मिळून तीन षटकांतच ४६ धावा वसूल करून डावाचं समीकरणच बदलून टाकलं. त्याने अवघ्या २० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान, त्याने ३  षटकार आणि ६ चौकार ठोकले.

तत्पूर्वी, एकीकडे बंगळुरूच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांना टिकून खेळणेही कठीण झालेले असताना रहमतुल्ला गुरबाझ एकट्यानेच खिंड लढवली होती.. इतर फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडत असताना गुरबाझने, चौकार षटकारांची आतशबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं होतं. मात्र १२ व्या षटकात करण शर्माला रिव्हस्र स्विप करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो झेलबाद झाला. मात्र तोपर्यंत त्याने ५७ धावांची खेळी केली.  

Web Title: IPL 2023, KKR Vs RCB: Shardul Thakur's 'Sholay', Stormy Half-Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.