Join us  

IPL 2023, KKR vs RR Live : अप्रितम झेल, भन्नाट क्षेत्ररक्षण! राजस्थानच्या माऱ्यासमोर कोलकाता हतबल

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनीच नव्हे तर क्षेत्ररक्षकांनी आज कमाल करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 9:14 PM

Open in App

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनीच नव्हे तर क्षेत्ररक्षकांनी आज कमाल करून दाखवली. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत असूनही कुठेतरी दबावात दिसले. ट्रेंट बोल्टने दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवल्याने KKRवर दडपण होते, त्यात RRच्या फिरकीपटूंनी ते आणखी वाढवले. वेंकटेश अय्यरने ( Venktesh Iyer) एकट्याने खिंड लढवली. युजवेंद्र चहलने आज ४ विकेट्स घेताना आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला.

RRने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पुनरागमन करणाऱ्या ट्रेंट बोल्टने KKRच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. जेसन रॉय ( १०)  व रहमनुल्लाह गुरबाज ( १८) यांचे अनुक्रमे शिमरोन हेटमायर व संदीप शर्मा यांनी अप्रतिम झेल टिपले. वेंकटेश अय्यर व नितीश राणा हे लेफ्टी फलंदाज मैदानावर असताना आऱ अश्विन व जो रूट यांना गोलंदाजीला आणून संजूने चांगला डाव खेळला. संयमी खेळ करणारी ही जोडी युजवेंद्र चहलने तोडली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात राणा ( २२) झेलबाद झाला. राणा व अय्यर यांची ४८ धावांची भागीदारी तुटली. चहलने या विकेटसह आयपीएलमध्ये सर्वाधिक १८४ विकेट्सचा विक्रम नावावर केला.

पण, वेंकटेश अय्यरने चहलला टार्गेट करताना उत्तुंग फटकेबाजी केली. संजूने गोलंदाजीत बदल करताना केएफ आसीफला गोलंदाजीला आणले अन् आंद्रे रसेलनं त्याचे षटकाराने स्वागत केले. पण, पुढचा चेंडू आसीफने आखूड टाकला अन् रसेलला ( १०) अश्विनच्या हाती झेल देण्यास भाग पाडून १९ चेंडूंत ३० धावांची भागीदारी तोडली. अय्यर दुसऱ्या बाजूने विकेट टिकवून KKRच्या धावा वाढवत होता. अय्यरने शैलीदार खेळ करून ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १७व्या षटकात चहलने गुगली टाकून अय्यरला जागच्याजागी मोठा फटका मारण्यास भाग पाडून झेलबाद केलं. अय्यर ४२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावांवर बाद झाला. त्याच षटकात चहलने KKRच्या शार्दूल ठाकूरला पायचीत केलं.

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या 

जोफ्रा आर्चरने 'इंग्लंड'कडून कधी खेळायचे हे Mumbai Indians ठरवणार; धक्कादायक Report

शिमरोन नाही सुपरमॅन! Six जाणारा चेंडू हेटमायरने अचंबितरित्या टिपला अन्... Video

युजवेंद्र चहलने 'इतिहास' घडविला, ड्वेन ब्राव्होचा सर्वात मोठा विक्रम मोडला

 

१९व्या षटकात चहलला गोलंदाजी देण्याचं धाडस RR ने दाखवलं अन् त्याने रिंकू सिंगला ( १६) बाद करून मोठं यश मिळवून दिलं. चहलने ४-०-२५-४ अशी सुरेख स्पेल टाकली. कोलकाताला ८ बाद १४९ धावा करता आल्या.

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सयुजवेंद्र चहल
Open in App