Join us  

मी पाहिलेली सर्वोत्तम फलंदाजी! यशस्वी जैस्वालची पाठ विराट कोहली, KL Rahul ने थोपटली

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : २१ वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आज कोलकाताचे इडन गार्डन गाजवले....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 10:16 PM

Open in App

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : २१ वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आज कोलकाताचे इडन गार्डन गाजवले.... यजमान कोलकाता नाइट रायडर्सची पहिल्या षटकापासून त्याने निर्दयी धुलाई केली आणि १३ चेंडूंत वेगवान अर्धशतक झळकावल्यानंतरही त्याची फटकेबाजी तशीच कायम राहिली. चौकार-षटकारांशिवाय आज त्याची बॅट दुसरी भाषा बोलतच नव्हती. यशस्वीच्या वादळी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा मजबूत पाया रचला गेला आहे आणि विराट कोहली व लोकेश राहुल यांनीही त्याचे कौतुक केले. 

वेंकटेश अय्यर ( ५७ ) वगळल्यास KKRकडून आज कोणाला फार कमाल करता आली नाही. RRच्या गोलंदाजांनी कमाल केलीच, परंतु त्यांना खेळाडूंनी अफलातून झेल व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दर्जेदार साथ दिली. युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेताना आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. जेसन रॉय ( १०)  व रहमनुल्लाह गुरबाज ( १८) यांचे अनुक्रमे शिमरोन हेटमायर व संदीप शर्मा यांनी अप्रतिम झेल टिपले. वेंकटेश अय्यर व नितीश राणा ( २२) यांनी ४८ धावांची भागीदारी केली.  आंद्रे रसेल ( १०) अश्विनच्या हाती झेलबाद झाला. कोलकाताला ८ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले.

यशस्वी जैस्वालने फॉर्म कायम राखताना पहिल्याच षटकात २६ धावा कुटल्या. KKRचा कर्णधार नितीश राणाने भलतेच धाडस दाखवले अन् यशस्वीने ६,६,४,४,२,४ अशी फटकेबाजी केली. आयपीएल इतिहासातील पहिल्या षटकातील ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यशस्वीने यंदाच्या पर्वात ५००+ धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. हर्षित राणाच्या दुसऱ्या षटकात जेसन रॉय ( ०) रन आऊट झाला, परंतु यशस्वीने शेवटच्या दोन चेंडूंवर त्यालाही झोडले. यशस्वीने १३ चेंडूंत अर्धशतक झळकावताना आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने लोकेश राहुल व ( १४) व पॅट कमिन्स ( १४) यांचा विक्रम मोडला.

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App