IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सने ईडन गार्डनवर उल्लेखनीय कामगिरी केलेली आतापर्यंत पाहायला मिळतेय. ट्रेंट बोल्टने कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन्ही ओपनर्सना माघारी पाठवल्यानंतर युजवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal) महत्त्वाची भागीदारी तोडली अन् इतिहास रचला.
राजस्थान रॉयल्सला आज कोणत्याही परिस्थितीत विजयपथावर परतावे लागणार आहे. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सने उशीरा लय पकडताना प्ले ऑफच्या शर्यतीत आगेकूच केलीय. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेसन रॉय व रहमनुल्लाह गुरबाज या यशस्वी जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. ट्रेंट बोल्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला अन् त्याने त्याचा करिष्मा दाखवला. तिसऱ्या षटकात जेसन रॉयने ( १०) खणखणीत षटका मारला... हा सिक्स जाणार याची KKRच्या चाहत्यांना खात्री होती, परंतु शिमरोन हेटमायर अचंबित करणारा झेल टिपला. पुढील षटकात बोल्टने आणखी एक धक्का देताना गुरबाजला ( १८) माघारी पाठवले. संदीप शर्माने यावेळी सुरेख झेल टिपला.
दोन्ही ओपनर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसननं फिरकी गोलंदाजांचा सुरेख वापर केला. KKRचा २९ चेंडूंत नंतर पहिला चौकार मारता आला. वेंकटेश अय्यर व नितीश राणा दोन लेफ्टी फलंदाज मैदानावर असताना आऱ अश्विन व जो रूट यांना गोलंदाजीला आणून संजूने चांगला डाव खेळला. १०व्या षटकात अय्यरने गिअर बदलला अन् अश्विनला दोन खणखणीत षटकार खेचले. त्या षटकात १८ धावा आल्याने KKR च्या १० षटकांत २ बाद ७६ धावा झाल्या. पुढच्या षटकात युजवेंद्र चहल गोलंदाजीला आला अन् त्याला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात राणा ( २२) हेटमायरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. राणा व अय्यर यांनी ४८ धावांची भागीदारी केली.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
जोफ्रा आर्चरने 'इंग्लंड'कडून कधी खेळायचे हे Mumbai Indians ठरवणार; धक्कादायक Report
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स; फॅन्सने जाणून घ्यायलाच हवे
शिमरोन नाही सुपरमॅन! Six जाणारा चेंडू हेटमायरने अचंबितरित्या टिपला अन्... Videoया विकेटसह चहल आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज ठरला. त्याची ही १८४ वी विकेट ठऱली अन् त्याने ड्वेन ब्राव्होचा १८३ विकेट्सचा विक्रम मोडला. यानंतर पियूष चावला ( १७४), अमित मिश्रा ( १७२), आर अश्विन ( १७१) व लसिथ मलिंगा ( १७०) यांचा क्रमांक येतो.
'