IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) आणि संजू सॅसमन यांनी आज इडन गार्डन गाजवले. १३ चेंडूंत वेगवान अर्धशतक झळकावून यशस्वी आयपीएल इतिहासातील सर्वात जलद फिफ्टी मारणारा फलंदाज ठरला. त्यानंतर त्याने संजू सॅमसनसह ७० चेंडूंत १२१ धावांची भागीदारी करून राजस्थान रॉयल्सला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. कोलकाता नाइट रायडर्सचे १५० धावांचे लक्ष्य RR ने १३.१ षटकांत सहज पार केले. यशस्वी ९८ धावांवर नाबाद राहिला अन् त्याचे शतक व्हावे यासाठी संजूने त्याग केला.
वेंकटेश अय्यर ( ५७ ) वगळल्यास KKRकडून कोणाला फार कमाल करता आली नाही. RRच्या गोलंदाजांनी कमाल केलीच, परंतु त्यांना खेळाडूंनी अफलातून झेल व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दर्जेदार साथ दिली. युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेताना आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. कोलकाताला ८ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले. यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात २६ धावा कुटल्या. हर्षित राणाच्या दुसऱ्या षटकात जेसन रॉय ( ०) रन आऊट झाला, परंतु यशस्वीने शेवटच्या दोन चेंडूंवर त्यालाही झोडले. यशस्वीने १३ चेंडूंत अर्धशतक झळकावताना आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. संजूने २९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. यशस्वीने ४७ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९८ धावा केल्या.
१३ वे षटक संपले तेव्हा संजू ४८ धावांवर होता, तर यशस्वीच्या ९४ धावा हव्या होत्या. सुयश शर्माच्या त्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संजू स्ट्राईकवर होता अन् राजस्थानला विजयासाठी ३ धावा हव्या होत्या. सुयशने Wide टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु संजूने तो चेंडू रोखला. पुढच्या षटकात यशस्वीला स्ट्राईल मिळाली. यशस्वीने षटकार खेचला असता तर त्याचे शतक झाले असते, परंतु त्याला चौकार मारता आला. पण, संजूने त्याच्या शतकासाठी केलेल्या त्यागाने विराट कोहलीने ख्रिस गेलच्या शतकासाठी केलेल्या खेळीची आठवण करून दिली.
Web Title: IPL 2023, KKR vs RR Live Marathi : Sanju give jaiswal chance to score 100, It was going for a wide & four then Samson defended it for Jaiswal.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.